कोचरा येथील गोविंद नरे ठरला उत्कृष्ट कुस्तीगीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:15 AM2020-01-28T11:15:24+5:302020-01-28T11:17:53+5:30

जामसंडे सन्मित्र मंडळाच्यावतीने जामसंडे येथे सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवातील जिल्हास्तरीय पुरुष कुस्ती स्पर्धेत कोचरा येथील गोविंद नरे उत्कृष्ट कुस्तीगीर ठरला असून त्यांनी सन्मित्र गदा पटकाविण्याचा मान मिळविला.

Govind Nare was the best wrestler in Kochra | कोचरा येथील गोविंद नरे ठरला उत्कृष्ट कुस्तीगीर

कोचरा येथील गोविंद नरे ठरला उत्कृष्ट कुस्तीगीर

Next
ठळक मुद्देकोचरा येथील गोविंद नरे ठरला उत्कृष्ट कुस्तीगीरजामसंडे येथील क्रीडा महोत्सव कुस्ती स्पर्धेत पटकाविली सन्मित्र गदा

देवगड : जामसंडे सन्मित्र मंडळाच्यावतीने जामसंडे येथे सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवातील जिल्हास्तरीय पुरुष कुस्ती स्पर्धेत कोचरा येथील गोविंद नरे उत्कृष्ट कुस्तीगीर ठरला असून त्यांनी सन्मित्र गदा पटकाविण्याचा मान मिळविला.

सन्मित्र मंडळाच्यावतीने कबड्डी, कुस्ती या मैदानी खेळांचा महासंग्राम जामसंडे येथील इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरी येथे सुरू असून जिल्हास्तरीय पुरुष कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटूंनी आपल्या खेळाची चमक दाखवून क्रीडारसिकांची वाहवा मिळविली.

जिल्हास्तरीय पुरुष कुस्ती स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.

  • ३२ किलो वजनी गट : प्रथम पार्थ देसाई, द्वितीय गौरव नाणेरकर, तृतीय ऋतिक पुजारे, चतुर्थ सूरज घाडी.
  • ३६ किलो वजनी गट : प्रथम अमोल कोकम, द्वितीय राज मुंबरकर, तृतीय दर्शन खरात, चतुर्थ पृथ्वीराज कदम.
  • ४० किलो वजनी गट : प्रथम सुमित राठोड, द्वितीय सागर तेली, तृतीय ऋतिक धुरी, चतुर्थ आर्यन राणे.
  • ४४ किलो वजनी गट : प्रथम साई परब, द्वितीय रितेश वडपकर, तृतीय भूषण राणे, चतुर्थ दुर्वांकूश मेस्त्री.
  • ४८ किलो वजनी गट : प्रथम रूपेश चव्हाण, द्वितीय अजित जाधव, तृतीय धर्मेश पुजारे, चतुर्थ सोनू जाधव.
  • ५२ किलो वजनी गट : प्रथम बाळू जाधव, द्वितीय गजानन माने, तृतीय भावेश चव्हाण, चतुर्थ रोहन राठोड.
  • ६० किलो वजनी गट : प्रथम मंदार शेट्ये, द्वितीय सागर कोरगावकर, तृतीय समीर जाधव, चतुर्थ किरण गोंधळी.
  • ६८ किलो वजनी गट : प्रथम रोहित जाधव, द्वितीय सिध्देश गुरव, तृतीय कल्पेश तळेकर, चतुर्थ नित्यानंद वेंगुर्लेकर.
  • ७६ किलो वजनी गट : प्रथम सुनील जाधव, द्वितीय प्रदीपकुमार रासम, तृतीय सिद्धार्थ गावडे, चतुर्थ गणेश राऊळ.
  • ७६ किलोवरील वजनी गट : प्रथम गोविंंद नरे, द्वितीय कौस्तुभ नाईक, तृतीय योगेश रावल, चतुर्थ सागर मासाळ.

    राज्यस्तरीय पुरूष गट कबड्डी स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात बंंड्या मारूती संघाने उत्कर्ष क्रीडा मंडळ संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात विजय क्लब संघाने गोल्फादेवी संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे पुरुष गटात विजेतेपदासाठी दोन्ही मुंबई संघांमध्ये लढत होणार आहे.

Web Title: Govind Nare was the best wrestler in Kochra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.