शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अमर जवान सदाशिव बाईत यांचे शासनाने स्मारक उभारावे!, कुटुंबियांची मागणी; १९७१ साली झालेल्या युद्धात झाले होते शहीद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 13:20 IST

देश सेवा करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सैन्य सेवा मेडल, स्टार मेडल, संग्राम मेडल देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या शौर्याचा देशातर्फे मरणोत्तर' बॅज ऑफ सॅक्रिफाइस ' हे शौर्य पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.

कणकवली : भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात शत्रूशी दोन हात करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे (भैरवगाव) गावचे रहिवासी जवान सदाशिव गंगाराम बाईत हे शहीद झाले होते. त्यांच्या हौतात्म्याला २१ डिसेंबर २०२१ रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात आणि त्यांचे कार्य नव्या पिढीपुढे यावे यासाठी त्यांच्या जन्मगावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे. किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणाला त्यांचे नाव शासनाने द्यावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे.        अमर जवान सदाशिव बाईत यांचा जन्म १ जून १९४० साली झाला होता. ते  आपल्या वयाच्या बाविसाव्या वर्षी म्हणजे ९ नोव्हेंबर १९६२ रोजी देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झाले.  मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव येथून ते सैन्यात भरती झाले होते. देश सेवा करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सैन्य सेवा मेडल, स्टार मेडल, संग्राम मेडल देऊन गौरविण्यात आले होते. भारतपाकिस्तान मध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात शत्रूशी दोन हात करताना ते शहीद झाले. त्यांच्या शौर्याचा देशातर्फे मरणोत्तर' बॅज ऑफ सॅक्रिफाइस ' हे शौर्य पदक देऊन गौरव करण्यात आला आहे. अशा या महान वीर जवानाचे कार्य नवीन पिढीसमोर यावे आणि नवीन पिढीने देश सेवेसाठी पुढे यावे अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा आहे.      सदाशिव बाईत यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सून  व  नातवंडे , पुतणे व  इतर कुटुंबीय आहेत. त्यांचे सुपुत्र रवींद्र उर्फ सुभाष बाईत हे कणकवली येथे पोलीस सेवेत कार्यरत आहेत. सदाशिव बाईत यांच्या जन्मगावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. त्यादृष्टीने त्यांचे पुतणे सुरेश बाईत व इतर कुटुंबीय प्रयत्न करीत आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गIndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्धSoldierसैनिक