शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

कोकणातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या विषयाला चालना देणार : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:12 IST

कोकणातील विविध प्रश्नांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला चालना देण्यात येईल.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केले असल्याची माहिती वैभव नाईक यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील विविध प्रश्नांकडे दीपक केसरकर, वैभव नाईक यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्षकोकणातील आमदारांची बैठक

कणकवली : कोकणातील विविध प्रश्नांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला चालना देण्यात येईल.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केले असल्याची माहिती वैभव नाईक यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोकणातील विविध प्रश्नांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील आमदारांची मंगळवारी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली.

या बैठकीत माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर व आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भातील बैठकीबाबत विचारणा केली.त्यावर लवकरच ही बैठक घेऊन शासकीय मेडिकल कॉलेजला चालना देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज होणे गरजेचे आहे.जेणेकरुन सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणत्याच आजार , साथरोग प्रसंगी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. सद्यस्थितीत आहे त्या आरोग्य सुविधांचा वापर करून जिल्ह्यात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.परंतु शासकीय मेडिकल कॉलेज ही जिल्ह्याची गरज आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी. अशी मागणी मी केली होती.तसेच दीपक केसरकर व मी 'बांदा ते चांदा' योजनेच्या ऐवजी प्रस्तावित असलेली 'सिंधू-रत्न योजना ' लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी केली.तसेच एस. आर.अंतर्गत रस्ते दुरुस्तीचा कार्यक्रम घेऊन निधी द्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त पदांबाबत चक्राकार पध्दतीने पदभरती घेण्यात यावी. सीआरझेड जनसुनावणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी ज्या अटी शिथिल करण्याची मागणी केली त्याचा विचार करून पुनरआराखडा व्हावा. समुद्री उधानांमुळे किनारपट्टी भागात जमीनीची धूप होत असून धुपप्रतिबंधक बंधारे मंजूर करावेत.

घरबांधणी परवानगीचे अधिकार ग्रापंचायतकडे देण्याबाबत निर्णय झाले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करून घरबांधणी परवानगीचे अधिकार पूर्ववत ग्रापंचायतकडे देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच लवकरच संबंधित विभागाच्या बैठका घेऊन हे विषय मार्गी लावणार असल्याचे सांगितले.यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब,मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद नार्वेकर ,उर्जा विभाग प्रधान सचिव असीम गुप्ता, मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव आशीषकुमार सिंग, मुख्यमंत्री प्रधान सचिव विकास खारगे,सल्लागार सचिव अजय मेहता, आदी उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :konkanकोकणMedicalवैद्यकीयsindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर Vaibhav Naikवैभव नाईक