शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

ओसरगावात ४८ लाखांच्या मद्यासह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

By सुधीर राणे | Updated: September 13, 2022 18:50 IST

कणकवली : राज्य उत्पादन शुल्कच्या कणकवली विभागाच्या पथकाने ओसरगाव पोस्ट बसथांब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने वाहतूक होणारा सुमारे ४८,५१,४८० रुपये ...

कणकवली : राज्य उत्पादन शुल्कच्या कणकवली विभागाच्या पथकाने ओसरगाव पोस्ट बसथांब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने वाहतूक होणारा सुमारे ४८,५१,४८० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला. या मद्यसाठयाची वाहतूक एक सहाचाकी सील लावलेल्या कंटेनरमधून छुप्या पद्धतीने करण्यात येत होती.या प्रकरणी विक्रांत विवेक मलबारी (वय ३३ , रा.ओरोस, ख्रिश्चनवाडी ता. कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचे ४५० बॉक्स,बिअरचे ६३ बॉक्स व वाहनाच्या किमतीसह एकूण ५५,११,४८०रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम निरीक्षक संतोष पाटील, जमदाजी मानेमोड, जवान शिवशंकर मुपडे, रणजित शिंदे, स्नेहल कुवेसकर मदतनीस गोट्या सुर्वे, सला खान यांचेसह भरारी पथक,सिंधुदुर्ग यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक संतोष पाटील  हे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी