शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध तोडून टाक, सांगूनही ऐकत नसल्याने पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 11:44 IST

ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केला. आरोपी पती, त्याचा मित्र गजाआड 

दोडामार्ग : प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध तोडून टाक, असे वारंवार सांगूनही पत्नी ऐकत नसल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला गोव्यातून घोटगेवाडीत आणून तिचा स्कार्फने गळा आवळून निर्घृण खून केला, त्यानंतर ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केला. ही घटना मंगळवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिलेचे नाव विशिता विनोद नाईक (३०, रा. वास्को गोवा) असे आहे.या प्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी तिचा पती विनोद मनोहर नाईक (४०, मूळ रा. बेलबाय वास्को व सध्या रा. पिंटो अपार्टमेंट म्हापसा-गोवा) व त्याचा मित्र ऋतुराज श्रावण इंगवले (२७, मूळ रा. चंदगड, जि. कोल्हापूर) यांना पहाटेपूर्वीच अटक केली.घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्या खाली अज्ञात महिलेचा चेहरा विद्रूप केलेला मृतदेह तेथील ग्रामस्थ दिनू मणेरीकर यांना मंगळवारी दिसला. पोलिसांना ही माहिती कळताच पोलिस निरीक्षक हृषीकेश अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साेळंखे आदींनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी केली आणि तपासाची सूत्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली.

पाेलिसी खाक्या दाखविताच गुन्हा कबूलमहिलेच्या पेहरावावरून ही महिला गोव्यातील असावी, असा अंदाज व्यक्त करीत त्यादृष्टीने तपास सुरू केला. म्हापसा पोलिस ठाण्यात विशिता विनोद नाईक ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या प्रियकराने केली असल्याचे समजले. त्यानुसार तिच्या प्रियकराकडे चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या वर्णनावरून तो मृतदेह विशिताचाच असल्याचा अंदाज त्याने वर्तवीत तिचा पती विनोदवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी विनोदला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला.

मित्राच्या मदतीने गळा आवळून संपविलेआपले सन २०१५ साली विशिताशी लग्न झाले. त्यानंतर दोन वर्षांनी आम्हाला मुलगी झाली. मात्र, सन २०२० ला विशिताचे तिच्या माहेरच्या गावातीलच एकाशी अनैतिक संबंध असल्याचे समजले. तिथपासून ती माझ्यापासून विभक्त राहत होती. घटस्फोटापर्यंत प्रकरण आले होते. विभक्त राहत असली तरी ती मला भेटत असे,

यादरम्यान तिला तिचे प्रियकराशी असलेले संबंध कायमचे संपविण्याबाबत समज दिली. मात्र, ती ऐकत नसल्याने गोड बोलून तिला दोडामार्गमध्ये आणून नंतर घोटगेवाडीत नेऊन आपण आपल्या मित्राच्या मदतीने सोमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास विशिताचा गळा आवळून खून केल्याची कबुली पती विनोद नाईकने दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस