शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ओंकार हत्तीवरून 'सीमावाद'; वन विभागाचा अजब कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:52 IST

गोवा वनपथकाची महाराष्ट्रात घुसखोरी; पोलिसांची अरेरावी अन् ग्रामस्थांचा संताप

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात 'ओंकार' हत्तीला हुसकावून लावण्याच्या मोहिमेत गोवावनविभागाचा अजब-गजब कारभार पाहायला मिळाला. चक्क महाराष्ट्र हद्दीत येऊन हत्तीला पिटाळून लावण्याचा प्रयत्न गोवा वन विभागाने केला, तर स्थानिक वन अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने कळणे परिसरात सोमवारी मोठा तणाव निर्माण झाला होता.ओंकार हत्ती सोमवारी पुन्हा गोवा हद्दीत शिरला असता, तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या टीमने हातात गुळाच्या ढेपा घेऊन त्याला चक्क फोंडियेमार्गे महाराष्ट्रात ढकलण्याचा जीवघेणा प्रकार केला. गोवा वन विभागाचे कर्मचारी कळणे परिसरात शिरल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

"दुसऱ्या राज्याच्या हद्दीत येऊन कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी?" असा जाब विचारत ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. अखेर लेखी आदेश दाखवता न आल्याने गोवा वनविभागाच्या पथकाने तेथून पळ काढला. या संपूर्ण प्रकारात दोडामार्ग वनविभागाच्या सुस्त कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुळाची ढेप अन् जीवघेणा खेळहत्तीला हुसकावण्यासाठी गोवा वनविभागाने चक्क गुळाचा आधार घेतला. ओंकारला गूळ खाऊ घालत त्याला गोव्यातून पुन्हा दोडामार्गच्या कळणे परिसरात आणले गेले. हा प्रकार पाहण्यासाठी बांदा राज्य मार्गावर मोठी गर्दी जमली होती. मात्र, अशा पद्धतीने वन्यप्राण्याला प्रलोभन दाखवून दुसऱ्या राज्यात ढकलणे हे नियमबाह्य असल्याचे सांगत ग्रामस्थांनी या मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला.वरिष्ठांचा हस्तक्षेपग्रामस्थांच्या संतापानंतर आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घेतल्यानंतर गोवा वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावरून गायब झाले. मात्र, या सीमावर्ती भागातील वन विभागाच्या नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.