शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

करूळ नाक्यावर 12 लाखांची गोवा बनावटीची दारू पकडली, दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 17:19 IST

आरामबसमध्ये स्वतंत्र जागा निर्माण करून दारूची वाहतूक

वैभववाडी : गोवा बनावटीची १२ लाख रुपये किमतीची दारू घेऊन धाराशिवला जाणाऱ्या ट्रकवर करूळ तपासणी नाक्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकमधील दोघांना अटक केली असून, दारूसह २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस हवालदार नितीन खाडे यांनी बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता केली.करूळ तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक एमएच १२ एचडी २६४४) आला. तेथे कर्तव्य बजावणारे पोलिस हवालदार खाडे यांनी हा ट्रक थांबविला. ट्रकचालक अमीर गुलाब तांबोळी आणि त्याचा सहकारी रोहित रोहिदास समदडे (रा. पाटोदा, ता. उस्मानाबाद) या दोघांकडे ट्रकमध्ये काय साहित्य आहे, याची विचारणा केली.तेवढ्यावरच न थांबता खाडे यांनी ट्रकमध्ये चढून पाहणी केली. तेव्हा तेलाचे डबे त्यांना दिसून आले. त्यांनी तेलाचे डबे तपासले असता आतील बाजुला गोवा बनावटीची दारू लपविल्याचे आढळून आले. ही माहिती त्यांनी पोलिस निरीक्षक अमित यादव यांना दिली.त्यानंतर आणखी काही कर्मचारी करूळ तपासणी नाक्यावर पोहोचले. त्यांनी दारू असलेला ट्रक वैभववाडी पोलिस स्थानकात आणला. त्यानंतर ट्रकमध्ये असलेल्या दारूची मोजदाद करण्यात आली. ट्रकमध्ये गोवा बनावटीची १२ लाख रुपये किमतीची दारू असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी ट्रकसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अमीर तांबोळी आणि रोहित समदडे या दोघांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार मारुती साखरे करीत आहेत.दारू वाहतुकीची चर्चागोवा बनावटीच्या दारूची ट्रक, टेम्पो, आराम बसमधून नियमित वाहतूक होत असल्याची चर्चा आहे. आरामबसमध्ये स्वतंत्र जागा निर्माण करून दारूची वाहतूक केली जाते. गाडीत असलेल्या प्रवाशांचा रोष ओढवू नये म्हणून पोलिस या गाड्यांची तपासणी करीत नसल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस