टेम्पोसह गोवा बनावटीची दारू जप्त, एक जण ताब्यात 

By अनंत खं.जाधव | Updated: September 9, 2022 12:46 IST2022-09-09T12:45:45+5:302022-09-09T12:46:28+5:30

गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह  55 हजार रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू बांदा येथे जप्त

Goa fake liquor seized with Tempo one arrested | टेम्पोसह गोवा बनावटीची दारू जप्त, एक जण ताब्यात 

टेम्पोसह गोवा बनावटीची दारू जप्त, एक जण ताब्यात 

सिंधुदुर्ग :

गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह  55 हजार रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू बांदा येथे जप्त करण्यात आली असून याप्रकरणी संजय मारूती गवस (42 रा. मधलीवाडी वाफोली) याला अटक करण्यात आली आहे.ही आज सकाळी करण्यात आली आहे.

कारवाईत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या पथकाने मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर श्री. बी. एच.तडवी, यांचे आदेशाने निरीक्षक . एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक. आर. जी. येवलुजे, दुय्यम निरीक्षक. एस. एस. गोंदकर व कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दिपक कापसे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Goa fake liquor seized with Tempo one arrested