शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 13:11 IST

Flood Sindhudurg : भयानक पूरस्थिती आणि महाप्रलयामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला २०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेद्वनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देकोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !संदेश पारकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कणकवली : भयानक पूरस्थिती आणि महाप्रलयामुळे मुंबई सह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे कोकणातील जनतेला फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.त्यासाठी शासन स्तरावरून सक्षम अभ्यासगट नेमून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या संकटातून जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला २०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेद्वनाद्वारे केली आहे.या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शासन स्तरावरून पूरस्थिती तसेच डोंगर खचणे या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यास गट नेमण्यात यावा. निसर्गाच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास असणाऱ्या जुन्या जाणत्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची मते व मार्गदर्शक सुचना जाणून घेण्यात याव्यात. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या प्रवाहाचे सर्वेक्षण करुन नदीपात्रातील गाळ प्राधान्याने उपसा करून नदीपात्रे खोल करण्यात यावीत.पुरामुळे बरेच दिवस गावे अंधारात राहू नये म्हणून पूरस्थितीजन्य गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या बसविण्यात याव्यात. जुने झालेले पुल, बंधारे, मोऱ्या यांचा सर्वे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबत योग्य ती उपाययोजना करुन पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा.

दरवर्षी अतिवृष्टीमुळे ज्या रस्त्यांवर, पुलांवर, नदींवर पूरस्थिती निर्माण होते तेथील नागरीकांना पर्यायी मार्ग व आपत्कालीन निवारा केंद्रे उभारणी करणे, कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी एनडीआरएफच्या धर्तीवर एक रेस्क्यू टीम सदैव तैनात ठेवणे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.नैसर्गिक प्रवाह बुजवून मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झालेल्या कामांचे सर्वेक्षण करुन स्ट्रक्चरल ऑडिट करावे. कोकणातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी.

कोरोना काळात आरोग्य विभागात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या सर्व डॉक्टर, नर्स, शिपाई व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करुन घ्यावे व या कोकणातील जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दोनशे कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संदेश पारकर यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :floodपूरkonkanकोकणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSandesh Parkarसंदेश पारकरsindhudurgसिंधुदुर्ग