कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 01:09 PM2021-08-02T13:09:21+5:302021-08-02T13:11:22+5:30

Flood Sindhudurg : भयानक पूरस्थिती आणि महाप्रलयामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला २०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेद्वनाद्वारे केली आहे.

Give a special package of Rs 200 crore for the flood victims in Konkan! | कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !

कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !

googlenewsNext
ठळक मुद्देकोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !संदेश पारकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कणकवली : भयानक पूरस्थिती आणि महाप्रलयामुळे मुंबई सह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे कोकणातील जनतेला फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.त्यासाठी शासन स्तरावरून सक्षम अभ्यासगट नेमून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या संकटातून जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला २०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेद्वनाद्वारे केली आहे.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शासन स्तरावरून पूरस्थिती तसेच डोंगर खचणे या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यास गट नेमण्यात यावा. निसर्गाच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास असणाऱ्या जुन्या जाणत्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची मते व मार्गदर्शक सुचना जाणून घेण्यात याव्यात. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या प्रवाहाचे सर्वेक्षण करुन नदीपात्रातील गाळ प्राधान्याने उपसा करून नदीपात्रे खोल करण्यात यावीत.

पुरामुळे बरेच दिवस गावे अंधारात राहू नये म्हणून पूरस्थितीजन्य गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या बसविण्यात याव्यात. जुने झालेले पुल, बंधारे, मोऱ्या यांचा सर्वे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबत योग्य ती उपाययोजना करुन पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा.

दरवर्षी अतिवृष्टीमुळे ज्या रस्त्यांवर, पुलांवर, नदींवर पूरस्थिती निर्माण होते तेथील नागरीकांना पर्यायी मार्ग व आपत्कालीन निवारा केंद्रे उभारणी करणे, कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी एनडीआरएफच्या धर्तीवर एक रेस्क्यू टीम सदैव तैनात ठेवणे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.

नैसर्गिक प्रवाह बुजवून मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झालेल्या कामांचे सर्वेक्षण करुन स्ट्रक्चरल ऑडिट करावे. कोकणातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी.

कोरोना काळात आरोग्य विभागात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या सर्व डॉक्टर, नर्स, शिपाई व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करुन घ्यावे व या कोकणातील जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दोनशे कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संदेश पारकर यांनी केल्या आहेत.

 

Web Title: Give a special package of Rs 200 crore for the flood victims in Konkan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.