छायाचित्रकाराना आर्थिक मदत द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:07 IST2020-04-18T14:05:58+5:302020-04-18T14:07:23+5:30
लॉकडाऊनमुळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा अर्थाजनाचा मार्ग बंद झाला असून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा आपत्कालीन सहाय्यता निधी आणि अन्य कोणत्याही लेखाशिर्षकाखाली आमच्याकरिता

कणकवली येथील कार्यालयात फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजय राणे,अनिकेत उचले,महेश दाभोलकर आदी उपस्थित होते.
कणकवली: कोरोनामुळे संपूर्ण देश ३ मे पर्यंत लॉकाडाऊन करण्यात आला आहे. त्याचा फटका फोटोग्राफी व्यवसायाला बसला असून फोटोग्राफर्स आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे छायाचित्रकाराना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना कणकवली तालुका फोटोग्राफर्स व व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्यावतीने शनिवारी देण्यात आले. यावेळी छायाचित्रकार संजय राणे,अनिकेत उचले,महेश दाभोलकर आदी उपस्थित होते.
या व्यवसायावर आपल्या कुटुंबाची गुजराण करणार्या छायाचित्रकाराना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मार्च ते जून हे चार महिन्यात धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक कार्यक्रमांमुळे छायाचित्रकाराचे अर्थाजन होते. लॉकडाऊनमुळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा अर्थाजनाचा मार्ग बंद झाला असून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा आपत्कालीन सहाय्यता निधी आणि अन्य कोणत्याही लेखाशिर्षकाखाली आमच्याकरिता निर्वाह भत्ता किंवा मदत निधी मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर आपण पाठपुरवठा करावा, अशी मागणी असोसिएशनतर्फे प्रांताधिकार्यांकडे करण्यात आली आहे.