Gavareda killed in train crash; Incident between Vaibhavwadi to Achirne | रेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू; वैभववाडी ते आचिर्णे दरम्यानची घटना 

रेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू; वैभववाडी ते आचिर्णे दरम्यानची घटना 

लोकमत न्यूज नेटवर्क 

कणकवली : मडगांवच्या दिशेने जात असलेल्या सीएसएमटी - मेंगलोर या रेल्वेगाडीची ट्रॅकवर अचानक आलेल्या गवारेड्याला धडक बसली . या धडकेत थेट इंजिनाच्या बफरमध्ये घुसलेला गवारेडा जागीच गतप्राण झाला. ही घटना वैभववाडी ते अचिर्णे यादरम्यान रविवारी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली .


या घटनेमुळे गाडी तब्बल दीड तास घटनास्थळी थांबून होती . दरम्यानच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून गवारेड्याला बाजूला केले.त्यानंतर गाडी नियोजित स्थळी मार्गस्थ झाली.

Web Title: Gavareda killed in train crash; Incident between Vaibhavwadi to Achirne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.