Ganpati Festival -' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाना निरोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:08 IST2020-08-24T18:05:39+5:302020-08-24T18:08:12+5:30
' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या भक्ति भावाने गणरायाचे पूजन करण्यात आले होते. तर रविवारी काही गणेश भक्तानी दीड दिवसांच्या गणरायाना निरोप दिला. जानवली तसेच गडनदी पात्रात श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात आले.

Ganpati Festival -' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाना निरोप !
कणकवली : ' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या भक्ति भावाने गणरायाचे पूजन करण्यात आले होते. तर रविवारी काही गणेश भक्तानी दीड दिवसांच्या गणरायाना निरोप दिला. जानवली तसेच गडनदी पात्रात श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात आले.
सिंधुदूर्ग जिल्ह्यासह कोकणात मोठ्या उत्साहात शनिवारी घरोघरी गणरायाचे आगमन झाले होते. गणरायाची पूजा , आरती मनोभावे करण्यात आली. काही ठिकाणी रात्री फिजिकल डिस्टन्सिंग पाळत सुश्राव्य भजनेही सादर करण्यात आली. गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दीड दिवसांच्या गणरायाना जड़ अंतःकरणाने निरोप देण्यात आला. नद्या, समुद्र, ओहोळ या ठिकाणी भाविक विसर्जनासाठी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दीड दिवसांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांची संख्या अधिक होती. ' गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात गणरायाना निरोप देण्यात आला. यानंतर पाच , सात, नऊ,अकरा, सतरा, एकविस अशा विविध दिवशी परंपरेप्रमाणे गणरायाना निरोप दिला जाणार आहे.
फोटो ओळ-- कणकवली येथे दीड दिवसांच्या गणरायाना रविवारी सायंकाळी निरोप देण्यात आला.