Ganpati Festival -विसर्जनस्थळी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:59 IST2020-08-24T17:58:33+5:302020-08-24T17:59:39+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन प्रसंगी गर्दी टाळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने शिवउद्यानजवळील हॉटेल मँगो २ जवळ कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. तेथे गर्दी टाळून गणेश विसर्जन केले जाणार आहे.

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला असून त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. यावेळी संतोष जिरगे, परिमल नाईक, दिलीप भालेकर उपस्थित होते.
सावंतवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन प्रसंगी गर्दी टाळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने शिवउद्यानजवळील हॉटेल मँगो २ जवळ कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. तेथे गर्दी टाळून गणेश विसर्जन केले जाणार आहे.
सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कृत्रिम तलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती परिमल नाईक, पाणीपुरवठा सभापती नासीर शेख, नगरसेवक मनोज नाईक, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते
सावंतवाडी शहरामध्ये दीड, पाच, सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यामुळे मोती तलावात विसर्जनप्रसंगी गर्दी होईल. ती गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषदेने हॉटेल मँगो २ शेजारी कृत्रिम तलाव तयार केला आहे. या तलावामध्ये गणेश विसर्जन करण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. श्री गणेश चतुर्थी सण साजरा करताना गणेश भक्तांनी कोरोनाचे संकट टाळण्यासाठी कोविड-१९ नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.
तलावाकाठी गर्दीची शक्यता
सावंतवाडी शहरातील सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन मोती तलावात केले जाते. दरवर्षी दीड, पाच, सात, नऊ, अकरा, एकवीस अशा सर्वच दिवशी मोती तलावाच्या काठावर गणेशभक्तांची गर्दी पहायला मिळते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषदेने कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.