शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चमत्काराची ‘गंगा’ अजूनही प्रवाहीतच

By admin | Updated: April 28, 2015 00:22 IST

मूळ प्रवाह बंद : चौदापैकी तेरा कुंडात मात्र पाणीच पाणी

राजापूर : गेल्या तीन वर्षांच्या काळात राजापूरच्या या जगप्रसिध्द गंगामाईचे प्रवाहीत राहण्याच्या कालखंडाचे उच्चांकावर उच्चांक होत राहिले आणि राजापूरच्या गंगामाईचे आजपर्यंत विज्ञानालाही न सुटणारे कोडे कायम राहिले आहे. मात्र, आता चार महिन्यांपूर्वी मूळ गंगा उगम स्थानातून येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला असला तरी उर्वरित चौदापैकी तेरा कुंडांमध्ये अद्याप पाणी असल्यामुळे हाही एक नवीनच चमत्कार मानला जात आहे. राजापूरची गंगा अवतीर्ण झाल्यानंतर आपल्या अनिश्चित स्वरुपाच्या कालावधीतील वास्तव्यात गंगामाता हजारो भाविकांना स्नान घडवते. साधारणपणे तेराव्या शतकापासून नियमितपणे पण अनियमित काळाने प्रवाहरुप होऊन भक्तांच्या पापक्षालनासाठी राजापूरनजीकच्या उन्हाळे गावच्या डोंगरावर प्रकट होणारी गंगा म्हणजे सृष्टीदेवतेचा एक अद्भूत चमत्कारच मानला जातो. त्यामुळे आता मूळ गंगा अंतर्धान पावल्यानंतरही इतर तेरा कुंडांमध्ये असणारे गंगेचे पाणी हाही एक चमत्कारच मानला जात आहे.दर तीन वर्षांनी प्रकट होणारी राजापूरची गंगा अंतर्धान पावल्यानंतर मूळ गंगा कुडांपाठोपाठ इतर तेरा कुंडेही कोरडी पडतात. मात्र, यावेळी मूळ गंगा प्रवाह जानेवारी महिन्यात बंद झाला असला तरी आजपर्यंत गंगाक्षेत्रावरील चंद्र्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंंड, कृष्णकुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्निकुंंड, भिमा कुंड, चंद्रभागा कुंंड यासह काशीकुंडामध्येही गंगाप्रवाह सुरु आहे. ही कुंडे अद्याप कोरडी पडलेली नाहीत. एरव्ही गंगा अंतर्धान पावल्यानंतर ऐन पावसाळ्याच्या काळातही ही सर्व कुंडे कोरडीच असतात. या कुंडांमध्ये जराही पाणी साचून राहात नाही. आजच्या घडीला काशीकुडांचे पाणी गोमुखातून वाहत नसले तरी काशीकुडांच्या मध्यभागी असणाऱ्या साधारण सात ते आठ फूट उंच भागामध्ये अद्याप पाणी आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून राजापुरात गंगा अवतीर्ण होत आहे. मात्र, तेव्हापासून असा चमत्कार कधी झाल्याच्या नोंदी इतिहासात आढळून येत नाहीत. गंगा अंतर्धान पावल्यानंतर गंगाक्षेत्री असणारी सर्व कुंडे पूर्ण सुकून जातात, असाच प्रघात आहे. मात्र, मूळगंगा कुंडाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या चंद्रभागा कुंडामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून सर्वकाळ पाणी राहायचे, असे गंगापूत्र सांगतात. मात्र, यावेळी हा नवीनच चमत्कार झाला आहे. राजापूरची गंगा हा एक अद्भूत चमत्कार मानला जात असून, आताच्या नवीन चमत्कारानेही भाविक नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाहीत. (प्रतिनिधी)चार महिन्यांपूर्वी मूळ गंगा उगम स्थानातून येणारा पाण्याचा प्रवाह बंद.उर्वरित चौदापैकी तेरा कुंडांमध्ये अद्याप पाणी.गंगा अंतर्धान पावल्यानंतर गंगाक्षेत्री असणारी सर्व कुंडे पूर्ण सुकून जातात, असाच प्रघात.गंगेचा आणखी एक चमत्कार.