जुगारअड्ड्यावर छापा प्रकरण; ३१ आरोपींची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:41 PM2020-02-08T15:41:54+5:302020-02-08T15:42:55+5:30

पाच वर्षांपूर्वी वेंगुर्ला म्हाडा कॉलनी येथे जुगारअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केलेल्या ३१ आरोपींची वेंगुर्ला न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच यात जप्त केलेल्या रकमेपैकी ७ लाख १५ हजार ९२० रुपये संबंधिताला परत करण्याचे आदेश दिले आहेत.

Gambling case raid case; निर् Innocent release of the accused | जुगारअड्ड्यावर छापा प्रकरण; ३१ आरोपींची निर्दोष मुक्तता

जुगारअड्ड्यावर छापा प्रकरण; ३१ आरोपींची निर्दोष मुक्तता

Next
ठळक मुद्देजुगारअड्ड्यावर छापा प्रकरण ३१ आरोपींची निर्दोष मुक्तता

वेंगुर्ला : पाच वर्षांपूर्वी वेंगुर्ला म्हाडा कॉलनी येथे जुगारअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केलेल्या ३१ आरोपींची वेंगुर्ला न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच यात जप्त केलेल्या रकमेपैकी ७ लाख १५ हजार ९२० रुपये संबंधिताला परत करण्याचे आदेश दिले आहेत.

१५ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक साहू यांनी कॅम्प येथील एका शेडमध्ये अचानक छापा  टाकून जुगाराच्या साहित्यांसह, मुद्देमाल आणि रोख रक्कम ८ लाख १९ हजार १२० रुपये जप्त  केले 

यावेळी संतोष गुरुनाथ नाईक, जयेश नामदेव दळवी, शंकर आत्माराम परब, संदेश लक्ष्मण कोचरेकर, श्रीकृष्ण शंकर भोगटे, राकेश भरत परब, गोरख मनोहर शारबिद्रे, विल्यम फ्रांसीस बोरजेस, बसीर सय्यद शेख, रुपेश रमेश सावंत, रवींद्र आत्माराम सावंत, अमित दिलीप जोशी, भूषण दीपक ढवळे, अंकुश बाबा निकम, ओमकार विष्णू मुडये, ज्ञानेश्वर वासुदेव हुले, रमेश धाकू निकम, पाडुरंग बाप पवार, प्रकाश सहदेव देसाई, लक्ष्मण सदानंद म्हाडदळकर, सत्यवान महोदव हरमलकर, सुनिल सखाराम म्हाडगुत, संजय आनंद केरकर, रत्नाकर अनंत मोर्ये, प्रसाद बाळकृष्ण मराठे, दिलीप मधुकर वेंगुर्लेकर, कमलाकर भिवा सरमळकर, भरत गणेश परब, शेखर लक्ष्मण गोळवणकर, यशवंत भास्कर परब आणि शैलेश उर्फ कुमा गुंडू गावडे या ३१ जणांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी वेंगुर्ला न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाकडून सबळ पुरावे सादर न झाल्याने वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश वि. द. पाटील यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

दरम्यान, आरोपींच्यावतीने युक्तीवाद करताना अ‍ॅड. प्रथमेश नाईक यांनी या घटनेवेळी जप्त केलेली रक्कम कुमा गावडे यांची वैयक्तिक आहे. त्याचा जुगाराशी संबंध नाही असा युक्तीवाद केला. तो ग्राह्य मानून जप्त केलेल्या रकमेपैकी ७ लाख १५ हजार ९२० रुपये संबंधिताना परत करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आरोपींच्यावतीने अ‍ॅड. प्रथमेश नाईक यांनी काम पाहिले. 

 

Web Title: Gambling case raid case; निर् Innocent release of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.