शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

सावंतवाडीतील गरीब महिलांची फसवणूक, तक्रार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 16:58 IST

दर महिना ३ हजार रुपये भरा आणि एक लाख कर्ज देतो, असे आमिष दाखवून गोव्यातील एका व्यक्तीने सावंतवाडीतील २० गरीब महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या महिलांनी सावंतवाडी शिवसेनेच्या महिला संघटक अपर्णा कोठावळे यांच्याकडे धाव घेतली.

ठळक मुद्देसावंतवाडीतील गरीब महिलांची फसवणूक, तक्रार अर्जशिवसेनेच्यावतीने पोलिसांत धाव, गोव्यातील व्यक्तीने दाखविले कर्जाचे आमिष

सावंतवाडी : दर महिना ३ हजार रुपये भरा आणि एक लाख कर्ज देतो, असे आमिष दाखवून गोव्यातील एका व्यक्तीने सावंतवाडीतील २० गरीब महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या महिलांनी सावंतवाडी शिवसेनेच्या महिला संघटक अपर्णा कोठावळे यांच्याकडे धाव घेतली.

कोठावळे यांनी तत्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी स्वाती यादव यांची भेट घडवून आणत महिलांना न्याय देण्याची मागणी केली. याबाबत तक्रार अर्ज पोलिसांत देण्यात आला आहे. त्यावरून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.सावंतवाडी शहरात अनेक निराधार, गरीब महिला आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करतात. याच संधीचा फायदा या महिलेने उचलला. एका मोलमजुरी करणाऱ्या महिलेशी ओळख करीत तुम्हांला १ लाखापर्यंत विनाव्याज कर्ज मिळणार आहे. त्यासाठी दर महिना ३ हजार रुपये तीन वर्षे भरले पाहिजेत, असे सांगितले.

गोवा-पेडणे भागातील कवठणकर नामक व्यक्ती ही स्कीम राबवित आहे. त्यांची तुम्हांला ओळख करून देते, असे सांगितले. मोलमजुरी करणाऱ्या महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी व वैद्यकीय सुविधांसाठी पैशाची गरज असल्यान शहरातील २० महिलांनी डिसेंबर २०१९ मध्ये महिना ३ हजार रुपयांचा हप्ता संबंधित महिलेकडे तर काहींनी गोव्यातून सावंतवाडीत आलेल्या कवठणकर यांच्याकडे दिला.काहींनी त्यांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम भरणा केली. त्यावेळी त्या व्यक्तीने हप्ते भरलेल्या महिलांकडून आधारकार्ड झेरॉक्स व बँक खाते नंबर घेतला. त्यानंतर ३ महिने उलटून गेले तरी १ लाख मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांना संशय आला. त्यांनी कवठणकरच्या मोबाईलवर संपर्क साधला.

त्यावेळी त्याने १ लाख कर्ज देण्यास टाळाटाळ करीत धमकी देत पैसे मिळत नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच सबंधित महिलेनेही हात वर केले. त्यामुळे पैसे भरलेल्या महिलांनी अपर्णा कोठावळे व प्रशांत कोठावळे यांच्याकडे धाव घेत माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग