शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील चार गावांची समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत निवड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:59 IST

३० जानेवारीपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार

सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सेलिब्रिटी भेटीसाठी सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, कुडाळ तालुक्यातील अणाव आणि कणकवली तालुक्यातील कलमठ आणि लोरे नंबर-१ या चार गावांची निवड करण्यात आली आहे. या चारही गावांत नियोजित कार्यक्रमानुसार ११ रोजी सेलिब्रिटी भेट देणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी निश्चित झालेल्या सेलिब्रिटीतील शिवाली परबऐवजी रसिका वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्विक प्रताप आणि रसिका वेंगुर्लेकर हे दोन सेलिब्रिटी या चारही गावांना भेट देणार आहेत.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत चांगले काम केलेल्या गावांना भेटी देण्यासाठी राज्य शासनाने सेलिब्रिटी नियुक्त केले आहेत. यातून अभियानाची प्रचार, प्रसिद्धी शासनाचा उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विनोदवीर कलाकार शिवाली परब आणि पृथ्विक प्रताप यांची निवड करण्यात आली होती. त्यात आता बदल करण्यात आला असून, शिवाली परबऐवजी रसिका वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही सेलिब्रिटी ११ जानेवारी रोजी जिल्ह्यात येऊन प्रशासनाने नियुक्त केलेल्या वेत्ये, अणाव आणि कलमठ आणि लोरे नंबर-१ या चार गावांना भेट देणार आहेत.राज्य शासनाने ग्रामीण विकासाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी व त्यासाठी प्रशासनाला आवश्यक असलेले सहकार्य सर्व घटकांचे लाभण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर २०२५ पासून राबविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधतानाचे, नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या या अभियानाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत होता. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत हा कालावधी वाढविण्यात आला आहे.३० जानेवारीपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार५ जानेवारीपासून या सेलिब्रिटी गावभेटी कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. ३० जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यासाठी निश्चित केलेल्या सेलिब्रिटींच्या गावभेटीचे राज्यस्तर वेळापत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागाने निश्चित केलेले आहे. त्यानुसार ११ जानेवारी रोजी अणाव गावात सकाळी ०९:२० वाजता सेलिब्रिटी जाणार आहेत. तेथून वेत्ये येथे ११:०० वाजता जाणार आहेत. दुपारी ०१:४० वाजता कलमठ येथे जाणार आहेत, तर शेवटची भेट लोरे नंबर-१ गावाला ०३:३० वाजता देणार आहेत. भेटीवेळी सेलिब्रिटी स्वागत स्वीकारणार असून, गावाने राबविलेल्या उपक्रमाची माहिती घेणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Four Sindhudurg villages selected for prosperous Panchayat Raj campaign.

Web Summary : Four Sindhudurg villages were chosen for the 'Samruddha Panchayat Raj' campaign. Celebrities Prithvik Pratap and Rasika Vengurlekar will visit Vetye, Anav, Kalamth and Lore No. 1 on January 11th to promote rural development and initiatives.