शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी आणखीन चौघांना अटक, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 13:48 IST

आज, सोमवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार.

सुधीर राणेकणकवली : कणकवली तालुक्यातील तळेरे येथे चार दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या दोघांना अटक केली होती. पोलीस कोठडीत असलेल्या त्या दोन संशयितांच्या चौकशीत याप्रकरणी आणखी चार संशयितांची नावे पुढे आली आहेत. त्या चौघांना कणकवली पोलिसांच्या पथकाने काल, रविवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यांना आज, सोमवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.यापूर्वी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या सखोल चौकशीत बिबट्या कातडीचा व्यवहार हा कुंभवडे-गावठणवाडीतील श्रीराम सखाराम सावंत  (वय २८) याच्यामार्फत झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्यापर्यंत ते संशयित कसे पोहोचले याची चौकशी केली असता कुंभवडे-शाळेवाडीतील संतोष मधुकर मेस्त्री (४३ ) याचे नाव पुढे आले. संतोष मेस्त्री हा यातील संशयित आरोपी राजेंद्र पारकर (वळीवंडे) याच्या संपर्कात होता. संतोष मेस्त्री हा रामगड येथे हार्मोनियम पेटी बांधण्याचे काम करतो. तो कुंभवडेत येवून जावून असतो. पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो कुंभवडे येथेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी संतोष मेस्त्रीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर श्रीराम सावंतलाही ताब्यात घेण्यात आले.श्रीराम याला बिबट्याची कातडी कुणी दिली? याची विचारणा केली असता आप्पा हरिश्चंद्र सावंत (भिरवंडे-परतकामवाडी) याने दिल्याचे त्याने सांगितले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्यासोबत मंगेश पांडुरंग सावंत (५४, भिरवंडे-परतकामवाडी) हाही असल्याचे सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आप्पा सावंत, मंगेश सावंत या दोघांनी दोन वर्षापूर्वी बिबट्याची शिकार केल्याचे पुढे येत आहे.तीन महिन्यापूर्वी ते कातडे विक्रीच्या उद्देशाने श्रीराम सावंत याच्याकडे देण्यात आले होते. मात्र ती शिकार कुठल्या जंगलात केली, त्यांच्यासोबत आणखी कोण होते? याचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी हे तळेबाजार, वळीवंडे येथील आहेत.तळेबाजार येथून तळेरेच्या दिशेने त्या कातडीची वाहतूक होत होती. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला त्याची खबर लागताच दोघांना चार दिवसापूर्वी कातड्यासह ताब्यात घेण्यात आले होते. यातून रविवारी आणखी चार संशयितांची नावे पुढे आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.बिबट्यांच्या वाढत्या शिकारी पाहता यामध्ये मोठे रॅकेटही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संशयित संतोष मेस्त्री, श्रीराम  सावंत, आप्पा  सावंत, मंगेश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, वृषाली बरगे करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी