शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
2
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
3
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
4
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
6
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
7
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
8
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
9
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
11
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
12
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
13
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
14
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
15
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
16
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
17
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
18
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
19
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
20
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: बिबट्याची नखे विक्रीसाठी आले, अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकले; डामरे येथे चौघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:52 IST

संशियत आरोपी कणकवली, कोल्हापूर, बेळगाव येथील

कणकवली : कणकवली वनक्षेत्रपाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचत डामरे गावच्या हद्दीमध्ये स्वामी समर्थ मठाजवळ बिबट्याची नखे व सुळे (दात) याच्या विक्रीसाठी आलेल्या चौघा व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून बिबट्याची बारा नखे व चार सुळे (दात) तसेच तीन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.या आरोपींची नावे विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट, ता. कणकवली), कृष्णात भिकाजी रेपे (रा. अकनुर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), तौफीक अल्लाउद्दीन सनदी (रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव) व परशुराम प्रकाश बोधले (रा. नवलीहाळ, ता.चिकोडी, जि. बेळगाव) अशी आहेत.कणकवली फोंडाघाट रस्त्यावर डामरे येथे पकडलेल्या या चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद व उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश शर्मा, सहायक वनसंरक्षक एस. के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली एस. एस. पाटील, फोंडा वनपाल धुळू कोळेकर, देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट, दिगवळे वनपाल सर्जेराव पाटील, वनरक्षक सुखदेव गळवे, प्रतिराज शिंदे, सिद्धार्थ शिंदे, रामदास घुगे, नितेंद्र पोर्लेकर, रोहित सोनगेकर, अंकुश माने, स्वाती व्हनवाडे, व रिद्धेश तेली, सागर ठाकूर यांनी केली. त्यांना मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे सहकार्य लाभले. वनविभागाच्या या कारवाईमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard claws for sale: Four arrested in Sindhudurg district

Web Summary : Four individuals were arrested in Sindhudurg for attempting to sell leopard claws and teeth. Forest officials seized twelve claws, four teeth, and three motorcycles. The arrest was made based on a tip-off, and further investigation is underway.