सोनाळी पात्रातील झुडपात आढळला वृद्धाचा मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:40 IST2017-10-02T16:40:00+5:302017-10-02T16:40:42+5:30

सोनाळी येथे सुकनदीच्या पात्रातील झुडपात अडकलेला वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. दुपारी 1.30 च्या सुमारास पोलिसांनी मृतदेह नदीच्या प्रवाहातून बाहेर काढला आहे. मृतदेह अनोळखी व्यक्तीचा असल्याने पोलीस ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रविवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीत वृद्ध वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Found dead in a gold-plated bush | सोनाळी पात्रातील झुडपात आढळला वृद्धाचा मृतदेह 

सोनाळी पात्रातील झुडपात आढळला वृद्धाचा मृतदेह 

वैभववाडी, 2 : सोनाळी येथे सुकनदीच्या पात्रातील झुडपात अडकलेला वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. दुपारी 1.30 च्या सुमारास पोलिसांनी मृतदेह नदीच्या प्रवाहातून बाहेर काढला आहे. मृतदेह अनोळखी व्यक्तीचा असल्याने पोलीस ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रविवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीत वृद्ध वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.


      रविवारी सायंकाळी वैभववाडी परिसरात अक्षरशः ढगफूटी झाली. त्यामुळे सुक-शांती नद्यांसह करुळच्या नदीलाही महापूर आला होता.   महापूर ओसरल्यावर सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास सोनाळी येथील नदीपात्रातील झुडपात मृतदेह अडकलेला आढळून आला. त्याबाबत तेथील ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली.


     मृतदेहाची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन केराम, हवालदार दशरथ घाडीगावकर, संजय खाडे, राजू जामसंडेकर आदी घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाटील संभाजी रावराणे यांच्यासह पोलीस व स्थानिकांनी दुपारी दीडच्या सुमारास मृतदेह नदीपात्रातील झुडपातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत वृद्धाच्या अंगात फक्त काळसर रंगाची हापपँट आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Found dead in a gold-plated bush