शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत

By अनंत खं.जाधव | Updated: August 24, 2022 19:24 IST

माजी खासदार सुधीर सावंत हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पण त्यांनी बारा वर्षापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

सावंतवाडी : माजी खासदार सुधीर सावंत यांनी आज, बुधवारी शिंदे गटाला समर्थन दिले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री दीपक केसरकर व उदय सामंत यांच्या सोबत पक्ष वाढवणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देत माजी सैनिकाबाबत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन घेतले. त्यानंतर केसरकरांनी सावंत यांचे स्वागत केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, गणेशप्रसाद गवस, शैलेश दळवी, सचिन वालावलकर, योगेश तेली, बबलू पांगम, विनायक शेट्वे, ओंकार परयेकर, ज्ञानेश्वर शेटवे उपस्थित होते.माजी खासदार सुधीर सावंत हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पण त्यांनी बारा वर्षापूर्वी काँग्रेसचा राजीनामा देत बसपामध्ये प्रवेश केला होता. मात्र तेथे त्यांचे विचार न पटल्याने अखेर आप मध्ये प्रवेश केला. तेथून ही ते बाहेर पडले. त्यानंतर महाराष्ट्रात माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात सक्रिय झाले होते. त्यांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक प्रश्न मार्गी लावत सैनिकांचे संघटन ही केले होते. आजही हे संघटन कायम आहे.हेच प्रश्न घेऊन शासन दरबारी अनेक प्रश्न मांडले पण त्याला न्याय मिळत नव्हता. अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवड्यापूर्वी भेट घेतली या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सैनिक प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत त्यातून मार्ग काढला. तसेच सैनिक निधी वितरित करत अन् प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज त्यांनी शिंदे गटाला सर्मथन देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान सावंत यांनी शिंदे गटाला दिलेल्या समर्थनाबाबत मंत्री उदय सामंत यांनी आभार मानत जिल्हयाला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण