शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात राष्ट्रवादीचा काँग्रेससह शिवसेनेला धक्का, माजी पदाधिकाऱ्यानी हाती बांधले घड्याळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 17:33 IST

आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने काँग्रेससह शिवसेनेला धक्का दिला आहे.

सावंतवाडी : आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने काँग्रेससह शिवसेनेला धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष काशीनाथ तथा बाबल्‍या दुभाषी यांच्यासह शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख राकेश नेवगी व गणेश निंबाळकर यांनी आज शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दुभाषी, नेवगी यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेसह काँग्रेसला धक्का मानला जात आहे.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी पक्षप्रवेश केलेल्या नव्या शिलेदारांचे स्वागत करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सामंत यांनी, स्वबळाची भाषा करण्यासाठी सध्याची परिस्थिती काय याची कल्पना सर्वांना आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी बळकट असताना देखील आमचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीकरून निवडणूका लढवायला प्राधान्य देत आहेत. काही काही लोकांना जर स्वबळाची खुमखुमी असेल तर त्यांनी त्याची परिक्षा घ्यावी, निवडणूका या पाच वर्षांनी येतच असतात असा टोला विरोधकांना लगावला.आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी वाढविण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न सुरू केले आहेत. आजच्या प्रवेशाने सावंतवाडीत राष्ट्रवादी पक्षाला आणखीन बळकटी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी येत्या काही दिवसांत असे अनेक पक्षप्रवेश पहायला मिळतील असे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना