शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

'रक्तात शिवराय, अंगामध्ये भगवा, माझी जनता भवानीमातेने दिलेली तलवार'; उद्धव ठाकरे कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 08:19 IST

‘अब की बार भाजपा तडीपार‘ हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे, असं आवाहान देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अंगामध्ये भगवा आहे. तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणारे नाही. महाराजांकडून तेजाचा, शौर्याचा एक कण जरी आपण घेतला; तरी आपण हुकूमशाहीला गाडून टाकू शकतो, असं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. माझी जनता ही माझ्यासाठी भवानीमातेने दिलेली तलवार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा ‘भगवा’ काय आहे, हे आता लाल किल्ल्यावर फडकवून दाखवणारच, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलं. ते सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेत बोलत होते.

शिवसेना कोणाची हे गद्दारांनी ठरवण्याची गरज नाही, जनतेला हे माहीत आहे. जनता हेच माझे सर्वस्व आहे. नसानसात गद्दारी भरलेल्यांना जनताच धडा शिकवेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. मिंधे जर शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करत असतील, तर ह्यांना राजकारणात गाडावंच लागेल. ही गाडण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. गुंडाच्या, लाचारांच्या देशा ही आमची ओळख नाही; ‘कणखर देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा’ ही आमची ओळख असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. जर तुम्हाला हुकूमशहा नको असेल, तर ‘अब की बार भाजपा तडीपार‘ हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे, असं आवाहान देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

राणेंवर शेलक्या शब्दांत टीका

कोकण म्हणजे मी म्हणणाऱ्यांना वैभव नाईक यांनी घरी बसवलंय. आता त्यांचे काही राहिले नाही. त्यामुळे घाबरून राहायचे नाही. गुंडगिरी शिवसेनेने मोडीत काढली आहे, अशा शेलक्या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समाचार त्यांनी घेतला.

विकासरथ जनताच अडवून जाब विचारतेय...

आम्ही हिंदुत्व सोडले म्हणून ओरड मारायची आणि धर्माधमति भांडणे लावून द्यायची हे आमचे हिंदुत्व नाही. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप विकासरथ फिरवून आपली विकासकामे सांगत आहेत; पण यांचे विकासरथ जनताच अडवून जाब विचास्तेय, यावरून तुम्ही काय विकास केलात हे जनतेला कळले आहे असे सांगत भाजपने केंद्रात राबविलेल्या योजनांचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. तसेच यातील अनेक योजना काँग्रेसच्या आहेत, फक्त्त नावे बदलली असे ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा