शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: खवले मांजर विक्रीचा प्रयत्न, एका अल्पवयीनासह पाच जण ताब्यात

By सुधीर राणे | Updated: December 2, 2024 12:12 IST

वारगाव येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई; खवले मांजरासह गाडी ताब्यात

कणकवली : कणकवली तालुक्यातील वारगाव येथील खवले मांजराची तस्करी करून विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच एक खवले मांजर व महिंद्रा पिकअप गाडीही त्या संशयित आरोपींकडून ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई काल, रविवारी करण्यात आली. या ताब्यात घेण्यात आलेल्या चार संशयित आरोपींची नावे विशाल विष्णु खाडये (३४,रा.लोरे नं. १, ता. कणकवली), संदीप तानाजी घाडी (४४, रा. मुटाट ता. देवगड ), गिरिधर लवू घाडी (४१, रा. मुटाट, ता. देवगड), गुरुनाथ धोंडु घाडी (५०,रा. मुटाट ता. देवगड)व अशी आहेत. तर एक अल्पवयीन मुलगा आहे.रविवारी दुपारी वनअधिकाऱ्यांना खवले मांजर विक्रीसाठी घेऊन काही लोक वारगाव येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सावंतवाडी व वनक्षेत्रपाल कणकवली यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी सापळा रचला.वनविभागाच्या पथकाला मुंबई -गोवा महामार्गावरील वारगाव येथील राजस्थानी ढाबा या ठिकाणी पाच आरोपी एक महिंद्रा पिक अप (क्रमांक एम. एच. ०७-एस-७०००) व एक वन्यप्राणी खवले मांजर मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.अधिक चौकशी अंती त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई  वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सावंतवाडी सचिन शिडतुरे, महेश पाटील, वनपाल सावळा कांबळे, सर्जेराव पाटील, धुळु कोळेकर, वनरक्षक प्रमोद जगताप, विष्णु नरळे, सचिन पाटील, सिध्दार्थ शिंदे, सुखदेव गळवे,  ब्रम्हकुमार भोजने, कोमल करकुड, दीपाली पाटील व इतर वन कर्मचारी यांनी केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग