परदेशातील पाहुण्यांची रत्नागिरीतील किनाऱ्यांपर्यंत भरारी
By Admin | Updated: November 5, 2014 23:34 IST2014-11-05T22:42:29+5:302014-11-05T23:34:16+5:30
अनेक पक्षी दाखल : विविधरंगी, विविध ढंगी विदेशी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांबरोबरच अभ्यासकांचीही समुद्रकिनाऱ्यावर होतेय मोठी गर्दी

परदेशातील पाहुण्यांची रत्नागिरीतील किनाऱ्यांपर्यंत भरारी
रत्नागिरी : कोकणात थंडीची सर्वात प्रथम चाहुल देणारे परदेशी पाहुणे हळूहळू कोकणातील किनाऱ्यांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांना अनेक परदेशी पाहुण्यांनी पांढराशुभ्र रंग दिला आहे. जिल्ह्यातील दापोली, गुहागर, भाट्ये, वेत्ये अशा विविध ठिकाणी सध्या परदेशी पाहुणे किनारी विसावल्याचे दिसत आहे.
कोकणच्या पाणथळ भागात ऐन हिवाळ्यात परदेशी पाहुण्यांचे आगमन होते. परदेशातील विविध पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून कोकणाकडे येतात. आकर्षक रंगसंगतीचे पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. सध्या फ्लेमिंग, सीगल, परदेशी बगळे आदी पक्षी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर आले आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच सीगल पक्ष्यांचे थवे मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर उतरल्याचे पाहायला मिळते. हिमाचल, लडाख आदी भागातून येणारे सीगल हिवाळ्याच्या हंगामात अन्नासाठी म्हणून कोकणात येतात.
परदेशी पाहुण्यांची ही गंमत पाहण्यासाठी देशी-परदेशी पर्यटकही रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर गर्दी करु लागले आहेत. या पर्यटकांमध्ये पक्षी अभ्यासकांचाही समावेश आहे. विविध पक्षी आता पर्यटकांनाही खुणावू लागले आहेत. किनारी गेल्यानंतर सिगलच्या थवेच्या थवे आभाळात उंचच उडताना दिसतात. पुढील पाच महिने नवीन पाहुण्यांचे किनारी वास्तव्य राहणार आहे. (प्रतिनिधी)
बगळेही आता कोकणातील किनाऱ्यावर विसावले आहेत. हिवाळ्यात हे बगळे मोठ्या संख्येने किनाऱ्यावर दाखल होतात. बगळ्यांच्या अनेक जाती असून, ते नदीकिनारी वास्तव्य करतात. नदीतील छोटे मासे ते आवडीने खातात. बगळ्यांच्या विणीचा हंगामही या हिवाळी मुक्कामातच कोकणात होतो.
हजारो किलोमीटर अंतर पार करुन परदेशातून आलेले सीगल पाहुणे एक-दोन नव्हे; तर चार ते पाच महिने आपला मुक्काम कोकणात करणार आहेत. काठीसारखे लालसर पाय व दणकट चोच यामुळे हे पक्षी सुंदर दिसतात.
फ्लेमिंगोसारखा दलदलीच्या भागात राहणारा पक्षीही हिवाळा अनुभवण्यासाठी कोकणातील किनाऱ्यावर येतो. दलदलीतील कीटक आवडीने खाणारा फ्लेमिंगो खाडी भागात विसावतो. गुजरातच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने आढळणारे हे पक्षी आता तुरळक संख्येने रत्नागिरी, गणपतीपुळे आदी किनाऱ्यांवर आढळून येत आहेत.