शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, काँग्रेसचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 5:30 PM

मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सेवा मिळत नाहीत. रुग्णालयाला असुविधांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सेवा मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात जावे लागत असून रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्री तसेच राज्यसरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना सांगितले.

ठळक मुद्देवैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, काँग्रेसचे आश्वासन मालवण ग्रामीण रुग्णालयात असुविधांचा पाढा

मालवण : मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सेवा मिळत नाहीत. रुग्णालयाला असुविधांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सेवा मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात जावे लागत असून रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्री तसेच राज्यसरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना सांगितले.मालवण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचा काँग्रेस पक्षाकडून आढावा घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, सरचिटणीस अरविंद मोंडकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, पल्लवी तारी, सेवादलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, शहरअध्यक्ष जेम्स फर्नांडिस, सरदार ताजर, लक्ष्मीकांत परुळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. नलावडे हेही उपस्थित होते.ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. रुग्ण तपासणी मशीन बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. अपघातग्रस्त रुग्णावर केवळ प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय किंवा गोवा बांबुळी येथे हलविण्यात येते. त्यामुळे गंभीर जखमी रुग्णांना जीव गमवावा लागतो. रुग्णालयात औषधेही उपलब्ध नाहीत. याबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे तुमच्या समस्या आमच्याकडे मांडा, आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करतो, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.रुग्णालयाला कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ज्ञ कधी देणार? शस्त्रक्रिया विभाग केव्हा सुरू करणार? गरोदर मातांसाठी खबरदारीच्या उपाययोजना कोणत्या आहेत? १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर का उपलब्ध नसतात? असे अनेक सवाल काँग्रेसकडून डॉ. पाटील यांना करण्यात आले. 

टॅग्स :congressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग