शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

धुक्यात हरवला सिंधुदुर्ग; आंबा, काजू फळांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 10:39 IST

ले आठवडाभर कडाक्याची थंडी अनुभवणार्या सिंधुदुर्गकरांची शनिवारची पहाट दाट धुक्याची दुलई घेऊनच उगवली.

सिंधुदुर्ग : गेले आठवडाभर कडाक्याची थंडी अनुभवणाऱ्या सिंधुदुर्गकरांची शनिवारची पहाट दाट धुक्याची दुलई घेऊनच उगवली. सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या या धुक्यात रिमझिम पडणाऱ्या पावसासारखे दव अंगावर झेलतच अनेकांनी धुक्यातून भटकंतीचा अनुभव घेतला. वीस फुटाच्या अंतरावरील स्पष्ट दिसत नव्हते. इतके धुके दाट होते. सकाळी नऊनंतर सूर्यदर्शन होत नव्हते. तोपर्यंत अवघी सृष्टी दवांनी चिंब झाली होती. साधारणपणे आॉक्टोबर महिन्यापासूनच धुक्याचे आगमन होते. पण यावर्षी पावसाळाच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबल्याने किरकोळ एक दिवसाचा अपवाद वगळता दाट असे धुके पडलेच नव्हते.

शुक्रवारी मात्र अचानक धुक्याने एंट्री केली. शनिवारी यापेक्षा दाट धुके पडले. सलग दुसऱ्या दिवशी धुक्याचा आनंद घेण्यासाठी हौशी नागरिकांनी पाणवठे गाठले. सावंतवाडी शहरातील मोती तलावकाठी धुक्याचे विलोभनीय दर्शन होत होते.

आंबा मोहोर गळणार

  • या धुक्याने आंबा, काजू पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील आठवडाभर पडत असलेल्या थंडीमुळे आंबा, काजू पिकाला पोषक वातावरण होते. उरलेला सुरलेला आंबा मोहोरायला सुरूवात झाली होती. मात्र, आता गेले दोन दिवस पडत असलेल्या धुक्यामुळे आंबा, काजू मोहोर धुक्याने जळून जाणार आहे.
  • यासाठी काही खबरदारी घेण्याचे आवाहन मुळदे कृषी संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार बागेत रात्रीच धुर करावा. जेणेकरून उष्णता राहून मोहरगळ कमी होईल. 

वाहने लाईट लावूनच

  • धुक्याची तीव्रता जास्त असल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती.
  • फॉग लॅम्पबरोबरच हेड लाइट लावल्याशिवाय समोरचे काही दिसत नव्हते. अशी धुक्याची दाट पसरली होती.
  • नदीजवळ, ओहोळ, तलावाजवळ तर धुके इतके होते की पाच फुटांवरचेही स्पष्ट दिसत नव्हते.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग