शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मालवणात पाच पर्यटक समुद्रात कोसळले; मुंबईतील दोन कुटुंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 8:22 PM

मुंबईतील दोन कुटुंबे पर्यटनासाठी येथे आली होती. जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी दांडी किनाऱ्यावर गेली होती. समुद्रात साहसी जलक्रीडा करत असताना काही अंतरावरून गेलेल्या बोटीमुळे अचानकपणे निर्माण झालेल्या लाटेचा तडाखा या पर्यटकांना बसला. यात दोन मुले, दोन पुरूष आणि एक महिला समुद्राच्या पाण्यात फेकले गेले.

ठळक मुद्देतिघांची प्रकृती गंभीर : ह्यजलक्रीडेह्णचा आनंद लुटताना घडला प्रकार

मालवण : पर्यटन हंगाम तेजीत आला असताना मालवणात दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. मालवण दांडी किनारपट्टीवर साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटत असताना मोठ्या लाटेत पाच पर्यटक समुद्राच्या पाण्यात फेकले गेल्याची घटना सोमवारी घडली. यात तिघा पर्यटकांची प्रकृती गंभीर बनल्याने खासगी रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा येथे त्यांना हलविण्यात आले.देवबाग येथे काही दिवसांपूर्वीच बोट दुर्घटना घडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतरही पर्यटकांचे अपघात होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. परिणामी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पर्यटकांची खबरदारी घेण्याबाबत तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मालवण पोलिसांनी बंदर विभागाला पत्र पाठविले आहे.

मुंबईतील दोन कुटुंबे पर्यटनासाठी येथे आली होती. जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी दांडी किनाऱ्यावर गेली होती. समुद्रात साहसी जलक्रीडा करत असताना काही अंतरावरून गेलेल्या बोटीमुळे अचानकपणे निर्माण झालेल्या लाटेचा तडाखा या पर्यटकांना बसला. यात दोन मुले, दोन पुरूष आणि एक महिला समुद्राच्या पाण्यात फेकले गेले.

पर्यटक समुद्रात फेकले गेल्याचे दिसून येताच त्यांनी तत्काळ त्यांना समुद्रातून बाहेर काढत शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. यात दोन मुलांना दुखापत कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र दोन महिला व एक पुरूष यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, तरीही अधिक उपचारासाठी त्या तिघांना गोवा येथे हलविण्यात आले.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग