पाच महिन्यांनंतर तळेरे रिक्षा स्थानक पुन्हा गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:10 IST2020-08-21T16:09:20+5:302020-08-21T16:10:52+5:30
तळेरे : तळेरे येथील आदर्श रिक्षा संघटनेचे रिक्षा स्थानक पुन्हा एकदा तब्बल पाच महिन्यांनंतर गणेश चतुर्थीसाठी गजबजले. लॉकडाऊनच्या काळात ...

मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील आदर्श रिक्षा संघटनेचे स्थानक पुन्हा एकदा गजबजू लागले आहे.
तळेरे : तळेरे येथील आदर्श रिक्षा संघटनेचे रिक्षा स्थानक पुन्हा एकदा तब्बल पाच महिन्यांनंतर गणेश चतुर्थीसाठी गजबजले. लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे रिक्षा व्यवसाय ठप्प होता. या काळात कोणतीही मदत न स्वीकारता त्यांची उपजीविका सुरू होती.
मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील आदर्श रिक्षा संघटनेचे सांघिक काम संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. या संघटनेमध्ये तळेरे परिसरातील अनेक रिक्षा व्यावसायिक समाविष्ट आहेत. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या संघटनेची जिल्ह्याला कोरोनाच्या महामारीत पुन्हा नव्याने ओळख झाली.
रिक्षा संघटना आपला वर्धापन दिन भव्य-दिव्य स्वरुपात साजरा करते. विशेष म्हणजे त्यात दरवर्षी नावीन्यता व कल्पकता दिसून येते. अशा कार्यक्रमांसाठी ही संघटना कोणतीही आर्थिक मदत न घेता आपल्या सभासदांच्या आर्थिक देणगीतून कार्यक्रम करते.
गणेश चतुर्थी एका दिवसावर आल्याने रिक्षा स्थानक पुन्हा गजबजले. बुधवारपासून या स्थानकात अनेक रिक्षा रांगेत उभ्या असलेल्या दिसून आल्या. विशेष म्हणजे रात्री-अपरात्री कधीही प्रवासी आल्यास त्यांना नेहमीच सहकार्य या रिक्षा संघटना आणि रिक्षा चालकांकडून मिळत असल्याचे अनेक प्रवासी सांगतात. स्वयंपूर्ण असलेल्या या रिक्षा संघटनेला अनेक वर्षांची परंपरा लाभलेली आहे.