शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:36 IST

कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत शासनाचे अनुदान लाटण्यासाठी, बँक कर्ज बुडविण्यासाठी प्रकल्प

कणकवली : कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.कणकवली शहरात ९०० कोटींचा कचरा प्रकल्प उभारला जात आहे. या कचरा प्रकल्पाबाबत शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांनी आक्षेप घेत हा प्रकल्प म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा आरोप कणकवली येथील विजय भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.यावेळी खासदार विनायक राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप नेते संदेश पारकर आदींनी कचरा प्रकल्पावर टीका केली. यावेळी अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, शैलेश भोगले, हर्षद गावडे, रुपेश नार्वेकर, सुजित जाधव तसेच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विनायक राऊत म्हणाले, ए.जी.डॉटर्स या कंपनीने दिल्ली गाझियाबाद तसेच पटना आणि कणकवली येथील नगरपालिकांबरोबर कचरा प्रकल्पाबाबत करार केलेले आहेत. मात्र, हा प्रकल्प केंद्र शासनाची सबसिडी आणि बँकांचे कर्ज लाटण्यासाठी केला जात आहे.कणकवली नगरपंचायतीने केलेल्या करारपत्रात या ९०० कोटींच्या कचरा प्रकल्पासाठी नारायण राणे कुटुंबीयांच्या अखत्यारित असलेल्या विविध आस्थापनांबरोबरच इंजिनिअरिंग कॉलेजमधून २ टन, मातोश्री वृद्धाश्रमातून ३ टन तसेच जिल्हा परिषद १२५ टन, दोडामार्ग नगरपंचायत ३ टन कचरा मिळणार असल्याची आकडेवारी समाविष्ट केलेली आहे. एवढा कचरा त्या ठिकाणाहून कसा मिळू शकेल? हे एक मोठे कोडेच आहे.सत्य डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्नकणकवलीवासीयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढेल. त्यामुळे जनतेला त्रास होईल अशी कोणतीही कृती त्यांच्याकडून होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  या प्रकल्पाचे सत्य आम्ही जनतेसमोर मांडत आहोत, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत