शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखांचा गंडा; युवकास सक्तमजुरी

By admin | Updated: September 20, 2014 00:33 IST

वर्गमित्रासहित त्याच्या बहीण-भावास फसविले

मालवण : वर्गमित्रासहित त्याची बहीण व भाऊ यांना सुमारे पाच लाख ५२ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कणकवली- तोंडवळी येथील श्रीकृष्ण श्यामसुंदर कुडतरकर (वय ४०) याला आज, शुक्रवारी मालवण न्यायालयाने दोषी ठरविले. त्याला दोन वर्षे सश्रम कारावास, तसेच वर्गमित्र व संबंधितांना तीन महिन्यांच्या आत सर्व रक्कम परत करण्याचे आदेश दिले. मुदतीत कुडतरकर याने रक्कम परत न दिल्यास सहा महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.कणकवली-तोंडवळी येथील श्रीकृष्ण कुडतरकर याने १६ नोव्हेंबर २०११ ते एप्रिल २०१२ या कालावधीत वर्गमित्र असणाऱ्या मालवण येथील आनंद संभाजी वळंजू यांना आलिशान फ्लॅट देतो, असे सांगून लाखो रुपयांना गंडा घातला होता. कुडतरकर याने वळंजू यांच्याकडून चार लाख ५० हजार रुपये, त्यांची ओरोस येथे राहणारी बहीण सविता सुनील कदम हिच्याकडून ३४ हजार रुपये, तसेच वळंजू यांचे भाऊ विलास वळंजू यांच्याकडून ६४ हजार रुपये वेगवेगळ्या कारणांसाठी घेतले होते. काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आनंद वळंजू यांनी कुडतरकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मालवण न्यायालयात याबाबत सुनावणी होऊन कुडतरकर याला दोषी ठरवून दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. कुडतरकर याने आनंद वळंजू, भाऊ विलास व बहीण सविता कदम यांना तीन महिन्यांच्या आत त्यांची घेतलेली रक्कम नुकसानभरपाईपोटी द्यावी. ही रक्कम न दिल्यास पुन्हा सहा महिन्यांची साधी कैद ठोठावण्यात आली. दिवाणी न्यायाधीश भेंडवडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. सतीश धामापूरकर यांनी काम पाहिले. या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबूराव राठोड यांनी तपास केला. (प्रतिनिधी)