शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत नीतेश राणे यांची पाच तास चौकशी; त्यानंतर पोलिसांनी गोव्याच्या दिशेने नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 08:28 IST

परब हल्लाप्रकरणी नीतेश बुधवारी शरण आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी  आमदार नीतेश राणे यांना अधिक तपासासाठी  सावंतवाडी येथून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत म्हणजे पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर नीतेश यांना गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे कोणत्या मुद्द्यांबाबत चौकशी केली याबाबतचा तपशील समजू शकला नाही.

परब हल्लाप्रकरणी नीतेश बुधवारी शरण आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.आमदार राणे यांचा ताबा कणकवली पोलिसांकडे देण्यात आला होता. बुधवारी रात्री ओरोस जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना सावंतवाडी येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा चौकशीसाठी त्यांना कणकवली ठाण्यात आणण्यात आले. यावेळी नीतेश व त्यांचे स्वीय सहायक राकेश परब यांची कणकवली पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली.

गोव्याच्या दिशेने नेले-

नीतेश यांना कणकवली पोलीस स्थानकातून गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. त्यामागचे नेमके कारण समजत नाही. परब हल्ल्याचा कट पुण्यात रचला गेला, अशी माहिती समोर येत होती, पण तपासाचा एक भाग म्हणून राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी गोव्यात नेले असल्याची शक्यता आहे. राणे कुटुंबीयांच्या गोवा कळंगुट येथील हॉटेलवर चौकशीसाठी त्यांना नेण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग