टायर फुटल्याने मच्छीचा ट्रक पलटी

By Admin | Updated: September 5, 2015 23:50 IST2015-09-05T23:49:53+5:302015-09-05T23:50:24+5:30

इन्सुली-डोबवाडीतील घटना : चालकाला दुखापत; वाहनाचे नुकसान

Fishermen's truck overturns the tire | टायर फुटल्याने मच्छीचा ट्रक पलटी

टायर फुटल्याने मच्छीचा ट्रक पलटी

बांदा : झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली-डोबवाडी येथे टायर फुटल्याने मासे वाहतूक करणारा टेम्पो महामार्गावर पटली झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची बांदा पोलिसांत नोंद करण्यात आली नाही.
अपघातग्रस्त टेम्पो वेंगुर्ले येथून माशांची गोवा-मडगाव येथे वाहतूक करत होता. सकाळी झाराप-पत्रादेवी बायपासवर सुसाट वेगात जाताना ट्रकचा मागील टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ट्रक महामार्गावरच पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघातात ट्रकचे व माशांच्या क्रेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रक पलटी झाल्याने क्रेटमधील मासे रस्त्यावर पडले होते. या अपघाताची बांदा पोलिसांत नोंद नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Fishermen's truck overturns the tire