शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पारंपरिक मच्छिमारांनी मत्स्य अधिकाºयांना विचारला जाब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 5:27 PM

जानेवारी महिन्यापासून पर्ससीन नौकांना बंदी असूनही पर्ससीन नौकांद्वारे व एलईडीद्वारे उघडपणे मासेमारी केली जात आहे. याकडे मत्स्य व्यवसाय खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यावर दोन दिवसांत मत्स्य परवाना

ठळक मुद्देमच्छिमार बांधवांची मत्स्य विभाग कार्यालयावर धडक विविध समस्यांबाबत लक्ष वेधले 

देवगड : जानेवारी महिन्यापासून पर्ससीन नौकांना बंदी असूनही पर्ससीन नौकांद्वारे व एलईडीद्वारे उघडपणे मासेमारी केली जात आहे. याकडे मत्स्य व्यवसाय खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यावर दोन दिवसांत मत्स्य परवाना अधिकारी यांच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्यास देवगड बंदराबाहेर एकही पर्ससीन नौका जाऊ देणार नाही, असा इशारा पारंपरिक मच्छिमार बांधवांनी मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देत परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांना दिला आहे. 

मासेमारी बंदी कालावधीतही अनधिकृत पद्धतीने पर्ससीन नौका, एलईडी लाईटद्वारे खुलेआम मच्छिमारी होत आहे. मात्र, या मच्छिमारीवर कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही. कारवाई करण्याकरीता मत्स्य परवाना अधिकारी निष्क्रिय असून मच्छिमारांच्या व्यथा त्यांना दिसत नाहीत का? असा सवाल पारंपरिक मच्छिमार बांधवांनी उपस्थित करून मत्स्य परवाना अधिकारी महाडवाला यांना धारेवर धरले. तसेच पारंपरिक मच्छिमारांवर पर्ससीन नौका, एलईडी मच्छिमारीमुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून येत्या दोन दिवसांत या पर्ससीन नौकांवर मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत ठोस कारवाई न झाल्यास देवगडमधील पारंपरिक मच्छिमार आपल्या नौका देवगड नस्तामध्ये उभ्या करून ठेवतील व पर्ससीन नौकांना बंदराबाहेर जाण्यास मज्जाव केला जाईल.

याबाबत होणाºया परिणामास सर्वस्वी मत्स्य व्यवसाय खाते जबाबदार राहील असा इशाराही मच्छिमारांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी तालुक्यातील पर्ससीन धारकांची यादीच पारंपरिक मच्छिमार बांधवांनी परवाना अधिकारी यांच्याकडून मागून घेतली. यावेळी पारंपरिक मच्छिमार जगन्नाथ कोयंडे, ज्ञानेश्वर खवळे, उमेश खवळे, भाऊ कुबल, बाळू बांदेकर, उमेश आंबेरकर, गणेश कुबल, बाळा कोयंडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.मत्स्य परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांना पारंपरिक मच्छिमार बांधवांनी जाब विचारला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार