मासेमारीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित
By Admin | Updated: December 26, 2014 00:50 IST2014-12-25T22:11:33+5:302014-12-26T00:50:25+5:30
खोल समुद्र : भारत सरकारच्या संकेत स्थळावर उपलब्ध

मासेमारीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित
ओरोस : खोल समुद्रातील मासेमारीसाठी (डीप सी फिशिंग) नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. याबाबत सविस्तर अहवाल भारत सरकारच्या पदुम विभागाच्या ६६६.ंिँ.िल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ँ३३स्र://ंिँ.िल्ल्रू.्रल्ल/ ्िर५्र२्रङ्मल्ल/ा्र२ँी१्री२.ं२स्र७ या स्थळावरसुद्धा डीपसीबाबतचे सर्व आदेश उपलब्ध आहेत.
या आदेशाच्या महत्त्वाच्या व्याख्या, मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.
विशेष आर्थिक प्रभाग- भारताच्या समुद्र किनाऱ्यापासून २०० सागरी मैलांपर्यंत आणि राज्याच्या जलधीक्षेत्रालगत व पलीकडील क्षेत्र, खोल समुद्रातील मासेमारी सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापलीकडील (राज्याच्या जलधीक्षेत्र बाहेरील) मासेमारी, खोल समुद्रातील मासेमारी नौका १५ मीटर व त्यावरील सर्वसाधारण लांबी असणाऱ्या मासेमारी नौका या प्रकारात येतात. कोणताही भारतीय व्यावसायिक, भागीदारी फर्म, खासगी मर्यादित कंपनी, सार्वजनिक मर्यादित कंपनी व महामंडळ, कोणत्याही मासेमारी नौकेस विस्तृत आर्थिक प्रभागमध्ये मासेमारीकरता चालवावयाची असेल तर लेखी परवानगी आवश्यक आहे. खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकेस केंद्र, केंद्रशासित प्रदेश, राज्य यांचे शासनाने यांत्रिक व पारंपरिक मासेमारी नौकांच्या साहाय्याने मासेमारी मच्छिमारांसाठी सागरी मासेमारी नियमन अधिनियमान्वये वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार वा कार्यकारी आदेशानुसार ठरवून दिलेल्या सागरी जलक्षेत्रात, राज्यांच्या जलधीक्षेत्रात व बंदी कालावधीत मासेमारी करता येणार नाही.
खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौका चालकास ज्या प्रकारचे मासेमारीसाठी परवानगी दिली आहे, त्या प्रकारचीच मासेमारी करता येईल. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये संरक्षित प्रजाती पकडता येणार नाहीत. बॉटम ट्रॅव्हलिंग, पेअर ट्रॅव्हलिंग, बुल ट्रॅव्हलिंग प्रकाराने मासेमारी करता येणार नाही. कोड आॅफ कंडक्ट फॉर रिस्पॉन्सिबल फिशरीज पाळावा लागेल. यासाठी विहित नमुन्यात शपथपत्र द्यावे लागेल.
खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकेस तिच्या अवागमनाची व खलाशांची माहिती तटरक्षक दलास जाण्यापूर्वी व परत आल्यावर देणे बंधनकारक आहे. एमएमडी वा अन्य अधिसूचित यंत्रणेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. मासेमारी करणाऱ्या नौकेस दिलेली मासेमारी परवानगी या अध्यादेशानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्यास रद्द करण्यात येईल व या नौका अवरूद्ध करण्यात येईल, असे राज्याचे मत्स्य
व्यवसाय आयुक्तांनी कळविले आहे. (वार्ताहर)