कुडाळ : कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात काही मच्छी विक्रेते मच्छीमार्केट व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी बसून किलोच्या दराने मच्छी विक्री करीत असल्याने त्याचा परिणाम मच्छीमार्केटमधील मच्छी विक्रेत्यांवर होत आहे. या प्रकारामुळे मच्छीमार्केटमध्ये ग्राहक येत नसल्याने मच्छीमार्केट ओस पडणार आहे. त्याचा फटका सर्वाना बसणार आहे. यामुळे सर्वच मच्छी विक्रेत्यांनी मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्री करावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी स्पष्ट केले आहे.नगरपंचायत हद्दीतील वेंगुर्ला-कुडाळ महामार्गावरील वेंगुर्लेकर वाडी नजीक रस्त्यावर लॉकडाऊनपासून मालवण येथील मच्छीविक्रेते अमित आडारकर हे किलो होलसेल दराने मच्छी विक्री करीत होते. मात्र, शनिवारी आडारकर यांची माणसे वेंगुर्लेकर वाडी नजीक मच्छी विक्री करीत होती. त्यामुळे कुडाळ मच्छी मार्केटमधील महिलांनी मच्छी मार्केटमध्ये कोणी येत नसल्याने आक्रमक पवित्रा घेत वेंगुर्लेकरवाडीनजीक बसलेल्या मच्छी विक्रेत्याला धारेवर धरीत मच्छी विक्री करण्यास प्रतिबंध केला.मच्छी विक्रेत्यांनी मानले आभारनगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सर्व महिलांची बाजू ऐकून घेत तुमच्यावर अन्याय होणार नाही, असे सांगत सर्वांनी नगरपंचायतीला सहकार्य करून, मच्छीमार्केट मध्येच बसून मच्छी विक्री करावी. असे सांगितले. यावेळी महिलांनी तेली यांचे आभार मानले.
मच्छीमार्केटमध्येच मच्छी विक्री करावी अन्यथा कारवाई : ओंकार तेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:35 IST
kudal, nagrpanchyat, fishmarket, sindhdurugnews कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात काही मच्छी विक्रेते मच्छीमार्केट व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी बसून किलोच्या दराने मच्छी विक्री करीत असल्याने त्याचा परिणाम मच्छीमार्केटमधील मच्छी विक्रेत्यांवर होत आहे. या प्रकारामुळे मच्छीमार्केटमध्ये ग्राहक येत नसल्याने मच्छीमार्केट ओस पडणार आहे. त्याचा फटका सर्वाना बसणार आहे. यामुळे सर्वच मच्छी विक्रेत्यांनी मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्री करावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी स्पष्ट केले आहे.
मच्छीमार्केटमध्येच मच्छी विक्री करावी अन्यथा कारवाई : ओंकार तेली
ठळक मुद्देमच्छीमार्केटमध्येच मच्छी विक्री करावी अन्यथा कारवाई : ओंकार तेली मच्छी विक्री करण्यास प्रतिबंध, मच्छी विक्री करण्यास प्रतिबंध