सावंतवाडीत भरवस्तीत आग, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 09:01 IST2022-06-08T09:00:51+5:302022-06-08T09:01:56+5:30
Sawantwadi : घटनास्थळी नागरिकांची गर्दी सुद्धा मोठ्याप्रमाणात झाली आहे. ही आग मुद्राळे यांच्या मांगराला लागली आहे.

सावंतवाडीत भरवस्तीत आग, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल
सावंतवाडी : शहरातील चितारआळी येथे भरवस्तीत मांगराला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले असून ही आग बुधवारी सकाळी लागली. आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी नागरिकांची गर्दी सुद्धा मोठ्याप्रमाणात झाली आहे. ही आग मुद्राळे यांच्या मांगराला लागली आहे.
लहान रस्ते असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशामक बंब घटनास्थळापर्यंत पोहचण्यास कठीण बनले आहे. नागरिकांकडून स्वत:च मिळेल, तेथून पाणी घेऊन आग विझवण्याचे काम सुरु आहे.
ही आग भरवस्तीत लागल्याने खळबळ माजली असून आजूबाजूच्या घरांना कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी नागरिक जीवाचे रान करत आहेत. मांगरात लाकूड प्लास्टिक सह इतर वस्तू ठेवल्याने ही आग भडकल्याची दिसत होती. उशिरापर्यंत आग धुमसत असून अग्निशामक बंब घटनास्थळी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.