शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत गॅरेजला आग; लाखोंचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 16:56 IST

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नरडवे रोड येथे असलेल्या साबिया गॅरेजला भीषण आग लागली.  या आगीची झळ गॅरेजच्या बाजुला असलेल्या ...

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नरडवे रोड येथे असलेल्या साबिया गॅरेजला भीषण आग लागली.  या आगीची झळ गॅरेजच्या बाजुला असलेल्या 'हॉटेल सदगुरु' लाही बसली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी एका रांगेत सुमारे २० ते २५ स्टॉल असून आग वेळीच आटोक्यात आणल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना काल, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.  आग लागल्याची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच  कणकवली नगरपंचायतीच्या अग्नीशामक बंबाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग वेळीच आटोक्यात आली. साबिया ऑटो गॅरेज मागील बाजूस अज्ञाताने थंडी पासून बचावासाठी कोणी शेकोटी पेटवली असावी. त्याचीच झळ लागून गॅरेजला आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत होता. या आगीत ऑईल व इतर सामानासह स्क्रॅप मधील गाड्या जळून खाक झाल्या. त्यानंतर लगतच असलेल्या 'हॉटेल सदगुरू’ला देखील या आगीची झळ बसली. मात्र, वेळीच उपस्थित नागरिकांनी त्यातील सामान बाहेर काढले. यावेळी सुशिल तांबे, वैभव आरोलकर, फर्नांडीस, ओमकार वाळवे, नगरपंचायत कर्मचारी जाधव, मोर्ये, गणेश लाड आदी उपस्थित नागरिकांनी मदत कार्य केले.  तर पोलीस नाईक पी.एस. पार्सेकर, मकरंद माने, होमगार्ड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत विविध प्रकारचे साहित्य मिळून एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे गॅरेज मालक अल्तमस शेख व शारूख शेख (बोर्डवे) यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग