शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

केसरकरांना पक्षनिधीतून आर्थिक मदत दिली, पुन्हा खोटे आरोप केल्यास..; विनायक राऊतांचा इशारा

By अनंत खं.जाधव | Published: February 20, 2024 3:50 PM

'माझ्या विरोधात राणेंनी उभे राहून दाखवावे'

सावंतवाडी : शिवसेनेला एक कोटी दिले, असे सांगणार्‍या मंत्री दीपक केसरकर यांना 2019 च्या निवडणुकी वेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी परतफेडीच्या अटीवर पक्षनिधीतून अर्थिक मदत दिली होती. ती रक्कम  गोव्याच्या कोणत्या हॉटेलात स्वीकारली तसेच त्यातील किती पैसे परत केले हे जाहीर करायला लावू नका. पुन्हा खोटे आरोप केले तर गप्प बसणार नाही येथील गांधी चौकात सभा घेऊन बुरखा फाडण्यात येईल असा इशारा  शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी मंत्री केसरकर यांना दिला आहे.ते मंगळवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सर्पक प्रमुख शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, रूपेश राऊळ, बाळा गावडे, मदार शिरसाट, मायकल डिसोझा, चद्रंकांत कासार, सुनिल गावडे, आबा सावंत, अनुप नाईक उपस्थित होते.शिवसेनेने मंत्रीपदासाठी आपल्याकडे कोट्यवधीची मागणी केली होती, असा आरोप करणार्‍या मंत्री दीपक केसरकर यांच्या आरोपांना खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत मला निवडून आणण्याची भाषा करणार्‍या मंत्री केसरकरांनी आता शिवसेनेचाच खासदार निवडून येणार आहे, हे लक्षात आल्यानंतर संधी साधली. परंतु आम्ही काही कृतघ्न होणार नाही. त्यांनी केलेल्या मदतीची आम्हाला जाणीव आहे. त्यावेळी शैलेश परब यांचे आमदारकीसाठी नाव चर्चेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला संधी दिली, हे विसरलात का? त्यावेळी आभार मानलेत मग आता खोटे का बोलत आहात असा सवाल खासदार राऊत यांनी केला.मंत्री केसरकर साईभक्त म्हणून सांगत आहेत मात्र आता ते खोटे बोलतात. अडचणीच्या वेळी मंत्री केसरकर यांना 2019 च्या निवडणुकीत परतफेड करण्याच्या अटीवर ठाकरेंनी तब्बल दोन वेळा पैसे दिले. परंतु केसरकर यांनी अर्धे पैसे परत केले, अर्धे अजूनही परत केलेच नाहीत. त्यामुळे राहिलेले पैसे आम्ही मागणार नाही. पण खोटे आरोप केले तर सोडणार ही नाही असा इशारा खासदार राऊत यांनी दिला. माझ्या विरोधात राणे यांनी उभे राहून दाखवावेमाझ्या विरोधात ऊभे राहून आपला पराभव करुन घ्यायचा असेल तरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी तसेच मंत्री दीपक केसरकर यांना लोकसभा लढविण्याची इच्छा आहे त्यामुळे अन्य लोकांची नावे पुढे करुन ते पदराआड राहून बाण सोडत आहेत असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Vinayak Rautविनायक राऊत