शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जनताच नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरु देणार नाही; सतीश सावंतांचा इशारा

By सुधीर राणे | Updated: October 20, 2022 15:15 IST

भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की, जाधव यांच्या उपस्थित कणकवलीत शिवसेनेचा मेळावा होईल. आम्ही त्यांना पुन्हा येथे आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू.

कणकवली: आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार भास्कर जाधव यांच्याबद्दल असंसदीय शब्दात टीका केली आहे. त्यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्यावतीने करण्यात आली. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले.तर, भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की, जाधव यांच्या उपस्थित कणकवलीत शिवसेनेचा मेळावा होईल. आम्ही त्यांना पुन्हा येथे आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू. आमदार नितेश राणे यांच्या वर्तनाने जनताच जिल्ह्यात यापुढे त्यांना फिरु देणार नाही असा इशारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला.यापुढे भास्कर जाधव यांचा पुतळा जाळत कोण धमकी देत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आमदार नितेश राणेंवर गुन्हा केव्हा दाखल करणार? ज्या पद्धतीने आमदार जाधव यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल केला. त्याच पद्धतीने नितेश राणेंवर गुन्हा दाखल करावा. सरकार आले म्हणून कोणी कायदा हातात घेऊ शकत नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांनी केली. तर उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांनी राणे यांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने तक्रार अर्ज दिला.यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी अध्यक्षा निलम पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड, नगरसेवक कन्हैया पारकर, उत्तम लोके, विलास गुडेकर, दिव्या साळगावकर, सचिन आचरेकर आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Shiv SenaशिवसेनाPoliceपोलिस