शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

कणकवली झेंडा चौकात भीषण आग; ३ दुकानांसह राहत्या घराला आगीची झळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 08:19 IST

कणकवली बाजरपेठेत सोमवारी पहाटे अचानक आगीचा प्रचंड प्रलय सुरू झाला.

कणकवली : कणकवली बाजरपेठेत सोमवारी पहाटे अचानक आगीचा प्रचंड प्रलय सुरू झाला. यात कणकवली झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊस जळून खाक झाले असून त्याशेजारील रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा व आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले . तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान व राहत्या घराला ही या आगीची झळ पोहचली . यावेळी कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सकाळपर्यंत पूर्णतः आग आटोक्यात आली नव्हती . 

दरम्यान , कणकवली झेंडा चौक येथील ३ दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत . या आगीचे नेमके कारण समजले नसले तरी ही आग शॉट सर्किटने लागली असावी , असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे .  याबाबत अधिक माहिती अशी की पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बंद असलेल्या जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस मधून मोठ्या प्रमाणात धुराचे व आगीचे लोट येवू लागले . त्या शेजारील राहत्या घरातील नागरिकांना याबाबत कल्पना आल्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती इतर शेजाऱ्यांना दिली . तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती.

तसेच या आगीने जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊसला गिळकृत करतानाच ही आग उचले किराणा दुकानाच्या दिशेने सरकली . त्याचप्रमाणे अंधारी यांच्या दुकान व घराच्या दिशेने आगीचे लोट पसरले होते . त्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने नगरपंचायतचा अग्नीशामक बंब घटनास्थळी पाठविला. बंब दाखल होताच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . 

दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर मागवत आग फैलावू नये म्हणून प्रयत्न करण्यात आले . मात्र , आग आटोक्यात येत नव्हती . भर बाजारपेठेत हे अग्नी तांडव सुरू झाल्याने आकाशात धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा दिसत होत्या . नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर , पोलीस निरीक्षक संजय धुमाळ , भाई साटम , प्रसाद अंधारी , अमित सापळे , नाना सापळे , प्रद्युम मुंज , बापू पारकर , हर्षल अंधारी , आदित्य सापळे , आशिष वालावलकर आदी नागरिक तसेच कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी मदत कार्य केले .  या आगीत दुकान मालक आबा उचले , राजेंद्र बजाजी , नाथा अंधारी यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे . तर आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली नगरपंचायतबरोबर मालवण , सावंतवाडी येथील अग्निशामक बंब मागविण्यात आला होता . मात्र हे बंब येण्यास वेळ लागणार असल्याने तसेच शेजारील घरे दाटीवाटीने असल्याने जेसीबीच्या साहाय्याने नुकसान टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

टॅग्स :Kankavliकणकवलीfireआग