कांस्यपदक विजेत्या अपूर्व पवारचा सत्कार
By Admin | Updated: January 29, 2015 00:13 IST2015-01-28T22:03:51+5:302015-01-29T00:13:52+5:30
१४ वर्षांखालील मुलांमध्ये डबल या प्रकारात सहभागी झालेले साहील पवार आणि महेश परिहार यांनी अपूर्वला खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले आणि जिल्ह्याच्या यशात भर घातली.

कांस्यपदक विजेत्या अपूर्व पवारचा सत्कार
रत्नागिरी : राज्यस्तरीय फूटबॉल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक विजेता अपूर्व पवार याचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा क्रीडा परिषद व प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी भारती संसारे, शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर व जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनीही अपूर्वच्या यशाचे कौतुक केले.जिल्हा क्रीडा संकुल, सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ‘रत्नागिरी तालुका’ आणि ‘रत्नागिरी जिल्हा व शहर फुटबॉल टेनिस असोसिएशनच्या’वतीने १४ वर्षांखालील एकेरी प्रकारामध्ये अपूर्व पवार याने जिल्ह्याच्या संघाचे नेतृत्व करुन राज्यात तिसरा येण्याचा मान मिळविला आहे. यावेळी त्याच्यासोबत १४ वर्षांखालील मुलांमध्ये डबल या प्रकारात सहभागी झालेले साहील पवार आणि महेश परिहार यांनी अपूर्वला खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले आणि जिल्ह्याच्या यशात भर घातली. अपूर्व हा मूळचा फणसवळे गावचा सुपुत्र असून, रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेमध्ये शिकत आहे.प्रशिक्ष कचेतन घाणेकर तसेच क्रीडा मार्गदर्शक श्रीपाद गुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक बी. डी. पोवार, उपमुख्याध्यापिका माधुरी भिडे, पर्यवेक्षक सी. एस. पाटील, क्रीडाशिक्षक पी. एस. कांबळे व विनोद मयेकर यांनी अपूर्वचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळमपाटील यांनी अपूर्वचा सत्कार केला. यावेळी शिक्षणाधिकारी भारती संसारे, क्रीडाधिकारी नितीन तारळकर, शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर आदी उपस्थित होते.