शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

कोल्ह्यांना पळवण्यासाठी स्पीकरवर वाघाची डरकाळी, चिपी विमानतळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:25 AM

Chipi Airport News: विमान लँडिंग झाल्यानंतर विमानतळ परिसरात फारतर वाहने, यंत्रे वा कर्मचाऱ्यांचा आवाज कानावर पडतो; पण सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर सध्या वाघाचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत.

मुंबई : विमान लँडिंग झाल्यानंतर विमानतळ परिसरात फारतर वाहने, यंत्रे वा कर्मचाऱ्यांचा आवाज कानावर पडतो; पण सिंधुदुर्गच्याचिपी विमानतळावर सध्या वाघाचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. बरे, खराखुरा वाघ हे आवाज काढत नसून, कोल्ह्यांना पळवून लावण्यासाठी स्पीकरवर रेकॉर्डिंग लावले जात आहे. कोल्ह्यांमुळे विमान प्रचलनात अडथळे येत असल्याने चिपी विमानतळ प्रशासन आणि वन विभागाने हा निर्णय  घेतला आहे.

चिपी विमानतळ परिसरात २५ ते ३० सोनेरी कोल्ह्यांनी वास्तव्य केले असून, ते सतत धावपट्टीवर येत असतात. त्यामुळे लँडिंग आणि टेक-ऑफ करताना अडथळे येत आहेत. विमानतळावर तैनात असलेले कर्मचारी या कोल्ह्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात; पण काही वेळाने ते पुन्हा दृष्टीस पडतात. त्यामुळे विमानसेवेवर परिणाम होऊ लागला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आजवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या; परंतु त्या फोल ठरल्या. त्यामुळे या कोल्ह्यांना पळवून लावण्यासाठी आता स्पीकरवर वाघाचा आवाज लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, विमान येण्याअगोदर काही काळ ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून धावपट्टीच्या परिसरात वाघाच्या डरकाळ्या स्पीकरवर ऐकवल्या जातात, असे एका कर्मचाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

विमानतळावर कोल्हे का येतात? चिपी विमानतळ २७५ एकरांत पसरले आहे. चहू बाजूंनी उंच कुंपण बांधण्यात आले असले, तरी हा दाट गवताळ प्रदेश असल्याने कोल्ह्यांनी तेथे वास्तव्य केले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची २ अंतर्गत सोनेरी कोल्हा (गोल्डन जॅकल्स) हा संरक्षित प्राणी घोषित करण्यात आला आहे. तो सर्वभक्षक आहे. फळे, पक्षी, कीटक, मासे आणि लहान सस्तन प्राणी खातो. या कोल्ह्याची शिकार आणि व्यापार हा दंडनीय गुन्हा आहे.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळTigerवाघsindhudurgसिंधुदुर्ग