शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारीच्या वादातून कणकवलीत दोघांवर जीवघेणा हल्ला!, तीन कारमधून आलेल्या टोळक्याने दांड्याने केली मारहाण

By सुधीर राणे | Updated: March 11, 2024 15:03 IST

ओळख पटू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधले 

कणकवली: कणकवली बांधकरवाडी येथील  चेतन दिलीप पवार व त्याच्यासोबत असलेला सुनील चव्हाण यांच्यावर रविवारी रात्री शासकीय ठेकेदारीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला आहे. हा हल्ला केल्याप्रकरणी पवार याच्या तक्रारीवरून संशयित आरोपीं विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेतन  पवार हा आपल्या जेसीबी ऑपरेटर सुनील चव्हाण याच्यासह कणकवली बांधकरवाडी जवळ दत्तकृपा निवारा शेड मध्ये रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बसला होता. यावेळी तिथे तीन कारमधून  ८ ते १० लोक आले होते. चेतन पवार याने  डिसेंबर २०२३ मध्ये देवगड येथील शासकीय कामाचा ठेका भरला होता. त्या ठिकाणी पवार आणि संशयित आरोपी यांच्यात कामाच्या ठेक्यावरुन वाद झाला होता. त्यावेळचा  राग मनात ठेवून आरोपी यांनी रविवारी  'तू देवगड मध्ये येऊन टेंडर का भरतोस ?' अशी विचारणा पवार याला केली. तसेच शिवीगाळ करीत आरोपीनी स्कॉर्पिओ गाडीतून आणलेल्या लाकडी दांडक्यांनी व दगडाने मारहाण करीत पवार व त्याचा साथीदार यांना गंभीर दुखापत केली.  ओळख पटू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधले संशयित आरोपींनी ओळख पटू नये यासाठी आपल्या तोंडाला रुमाल बांधले होते. याप्रकरणी चेतन पवार याने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून  कणकवली पोलिसानी संशयितांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस