शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई न केल्यास उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 20:27 IST

कर्ली खाडीत बेसुमार व अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधून सुद्धा सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. याला अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास वाळू उत्खनन करणाऱ्यांकडून ग्रामस्थांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. तरी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कडक कारवाई करावी अन्यथा खाडीपात्रातच आमरण उपोषण छेडू, असा इशारा देवली वाघवणे येथील रहिवाशांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देअनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई न केल्यास उपोषणदेवली वाघवणे येथील रहिवाशांनी दिला इशारा

सिंधुदुर्गनगरी : कर्ली खाडीत बेसुमार व अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधून सुद्धा सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. याला अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास वाळू उत्खनन करणाऱ्यांकडून ग्रामस्थांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. तरी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कडक कारवाई करावी अन्यथा खाडीपात्रातच आमरण उपोषण छेडू, असा इशारा देवली वाघवणे येथील रहिवाशांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

खाडीत संघर्ष झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. अवैध वाळू उत्खननाविरोधात मंगळवारी देवली वाघवणे येथील विरेश मांजरेकर, सत्यवान चव्हाण यांसह अन्य ग्रामस्थांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने कर्ली खाडीतील पुलापासून दोन्ही बाजूस ६00 मीटर अंतर सोडून वाळू उपसा व साठा करण्यास परवानगी दिलेली असताना लिलावधारक १00 मीटर अंतरावर वाळू उपसा करीत आहेत. याला ग्रामस्थांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास धमकी व जीवे मारण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे मेरीटाईम बोर्ड व मालवण तहसीलदार यांचे लक्ष वेधूनसुद्धा अनधिकृत वाळू उत्खनन थांबलेले नाही.देवली वाघवणे येथील रेती उपगट डी-५ मध्ये १५ होड्यांची परवानगी असताना त्याठिकाणी ५0 होड्या दिवस-रात्र बेसुमार वाळू उपसा करीत आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. खार बंधाऱ्यांवरून वाळू वाहतूक होत आहे. येथील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

अनधिकृत वाळू उत्खननामुळे खार बंधारा वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जर पूरस्थिती निर्माण झाली आणि खार बंधारा फुटला तर २५0 लोकवस्तीची एक वाडी वाहून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे, असेही म्हटले आहे.

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्ग