शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:15 IST

Rain AgricultureSector Sindhudurg : कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाने आता अचानक विश्रांती घेतली आहे. गेले तीन दिवस कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. यापुढील कालावधीत कडक ऊन असेच पडल्यास भातशेती सुकून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत अचानक विश्रांती : कडक ऊन पडत असल्याने चिंता

कणकवली : कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाने आता अचानक विश्रांती घेतली आहे. गेले तीन दिवस कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. यापुढील कालावधीत कडक ऊन असेच पडल्यास भातशेती सुकून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या मध्यांतरात तौक्ते चक्रीवादळ आल्याने, त्या कालावधीतच मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी भेडसावणारी पाण्याची समस्या मात्र दूर झाली, तर शेत जमीन ओलीचिंब झाल्याने शेतकरीही सुखावला होता. त्यानंतर, पावसाचा ओघ कायमच राहिल्याने, अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यातच नांगरणीला सुरुवात केली होती.

दरवर्षी ही नांगरणी जूनच्या मध्यानंतर केली जाते. मात्र, पुरेशा पडलेल्या या पावसाने यावर्षी सारे काही चित्रच बदलून टाकले. त्यानंतर, शेती कामांना वेग येत पेरणी करून आता भात वाण लावणी योग्य झाले आहे.मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभरात पावसाची तुरळक सर कोसळत असली, तरी तिचा भात शेतीसाठी उपयोग नाही. त्यामुळे मोठा पाऊस येणार की नाही, या चिंतेत शेतकरी पडला आहे. अधूनमधून काळे ढग येऊन पावसाचे चिन्ह निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत आहेत.शेतकरी मोठ्या अडचणीतजूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या भाताचा कालावधी पूर्ण झाल्याने आता ते लावणीयोग्य झाले आहे. मात्र, पाऊस येण्याची चिन्हेच नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पाऊस नसल्याने उंच भागातील जमिनीतील पाणी सुकून गेले आहे, तर गेल्या २ ते ४ दिवसांत लावणी केलेले भात पाऊस न पडल्यास सुकण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्याचे डोळे नभाकडे लागून राहिले आहेत, तर काही भागांत शेती वाळून जाऊ नये, यासाठी कृत्रिम पाण्याचा उसपा करून शेतीला पाणी पुरविले जात आहे. भरडी शेती असलेले शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस