शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:22 IST

यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम २०१८ साठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ६० हजार हेक्टर क्षेत्रावर या हंगामात शेतीलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुकावार याबाबतचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अरूण नातू यांनी दिली. सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पाऊस कोसळू लागला आहे. मान्सून येत्या दोन दिवसांत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पाऊस वेगाने कोकण किनारपट्टीकडे सरकत असल्याने ही शक्यता खरी ठरू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची लगबग वाढली असून त्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळविला आहे. शेतीपूर्वीची मशागत पूर्ण झाली असून मुसळधार पाऊस पडताच प्रत्यक्ष शेतीच्या कामांना प्रारंभ होणार आहे. पाणथळ भागात शेती असणाºया शेतकºयांनी भात पेरणी सुरू केली आहे. तर भरडी शेती असणाºया शेतकºयांना पावसाची वाट पहावी लागणार आहे.२०१७-१८ च्या खरीप हंगामात ३२८७ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला होता. हा पाऊस ९२ टक्के झाला होता. त्यामुळे हंगामातील शेतीला हा पाऊस पोषक ठरला होता. परिणामी या वर्षात जिल्ह्याची भात उत्पादकता प्रति हेक्टरी ३२०१ किलो एवढी राहिली होती. ६५ हजार ४०० हेक्टरवर शेती करण्यात आली होती. १ लाख ७० हजार ६७७ मेट्रीक टन भाताचे तर नागलीचे २११० मेट्रीक टन उत्पादन जिल्ह्याला मिळाले होते. खरीप हंगाम २०१८ मध्ये प्रशासनाने सुधारित व संकरित वाणांच्या वापरासाठी बियाण्यांची व रासायनिक खतांची उपलब्धता शेतकºयांना करून देण्याचे नियोजन केले आहे. यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान, प्रशिक्षणे व कृषी महोत्सव उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. सगुणा भात उत्पादनाचा प्रसार करून भात उत्पादन वाढविण्याचे नियोजन आहे. नागली बियाण्याचे सुधारित वाण उपलब्ध करण्यात येणार आहे. बियाण्यांद्वारे पसरणाºया रोगाला प्रतिबंध करण्यासाठी बीज प्रक्रियेची मोहीम राबविण्यात येणार आहे. श्री व सगुणा पद्धतीच्या प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. शेतकºयांना तूर बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे. चारा पिकासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. तसेच दुबार पिकाला प्राधान्य देण्यात येणार आहे.यावर्षी खरीप हंगामासाठी १६ हजार मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया - ७९२० मेट्रीक टन, डी.ए.पी. - ११८० मेट्रीक टन, एस.एस.पी - ११००  मेट्रीक टन, एम.ओ.पी - ७४५ मेट्रीक टन, २०.२०.००. - ८० मेट्रीक टन, १५.१५.१५. - ३२९० मेट्रीक टन, १०.२६.२६. - २३५० मेट्रीक टन, १९.१९.१९. - ३७५ मेट्रीक टन, १८.१८.१०. - २३०५ मेट्रीक टन, १०.१०.१०. - २३०० मेट्रीक टन, १२.३२.१६. - ५३० मेट्रीक टन याप्रमाणे खताची मागणी करण्यात आली आहे. असे असले तरी  १ जूनपर्यंत खत किंवा बियाण्यांची शेतकऱ्यांना उपलब्धता झालेली नव्हती. 

अशी आहे बियाण्यांची मागणीसुधारित व संकरित बियाण्यांचा वापर वाढविणे हे उत्पादकता वाढविण्याचे प्रमुख तंत्रज्ञान आहे. २०१७ मध्ये महाबीज व खासगी उत्पादकांमार्फत ४९८० क्विंटल भात बियाण्यांचे वितरण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बियाणे बदलाचे प्रमाण ३० टक्के गृहीत धरून २०१८ च्या खरीप हंगामासाठी ६६९६ क्विंटल बियाणे वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात सुधारित व संकरित बियाणी आहेत. यामध्ये सह्याद्री हे संकरित वाण असून मसुरी, जया, सुवर्णा, रत्ना, कर्जत-२, कर्जत-३, कर्जत-५, कर्जत-७, कर्जत-१८४, बीपीटी-५२०४, श्रीराम, इंद्रायणी, भोगावती, रत्नागिरी-१, रत्नागिरी-२४ या सुधारित बियाण्यांचा समावेश आहे. पीककर्ज वाटप नियोजन२०१८ च्या खरीप हंगामात २३ हजार ८३३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा बँक ७ हजार १६६ लाख रुपये, राष्ट्रीयकृत बँका १५ हजार ७५ लाख रुपये, ग्रामीण बँक ७७० लाख व इतर बँका मिळून ८२२ लाख रुपये कर्जाचे वाटप करणार आहेत. तसे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र जिल्ह्यात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेली गावे नसल्याने पुनर्गठण निरंक ठेवण्यात आले आहे.  १५०० प्रात्यक्षिके घेणारजिल्ह्यात एकूण ९३९ हेक्टर जमिनीला पुरेल असे भात बियाणे १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. यात १० वर्षांआतील बियाणे ६२६ हेक्टर क्षेत्रासाठी तर १० वर्षांवरील ३१३ हेक्टर क्षेत्रासाठी बियाणे वितरित करण्यात येईल. एकूण १५०० भात बियाणे लागवडीची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.  चांदा ते बांदा योजनेतून ९०० प्रात्यक्षिके व अन्य ६०० प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. श्री व सगुणा पद्धतीने भात लागवड कशी करावी, यासाठी प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस