शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजना :९१ प्रस्ताव अद्याप प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:15 IST

सिंधुदुर्ग : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत १५४ मृत व ...

ठळक मुद्देशेतकरी अपघात विमा योजना :९१ प्रस्ताव अद्याप प्रलंबित१५४ शेतकऱ्यांपैकी ५५ जणांना लाभ, अनेक लाभार्थी वंचित

सिंधुदुर्ग : गोपीनाथ मुंडेशेतकरीअपघात विमा योजनेचे सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत १५४ मृत व अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी केवळ ५५ शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे. तर ८ प्रस्ताव विमा कंपनीने नाकारले आहेत.

तालुकास्तरावर २१ आणि विमा कंपनीकडे ७० असे एकूण ९१ प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, कृषी पर्यवेक्षक परिपूर्ण प्रस्ताव सादर करीत नसल्याने अपघातग्रस्तांचा वारसदार या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकरीवर्गाकडून केला जात आहे.शेतकºयांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात अपंगत्व आल्यास त्याला अर्थात त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास व दोन अवयव निकामी झाल्यास लाभार्थ्यास २ लाख तर एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये विमा दिला जातो. दरवर्षी एक विमा कंपनी निश्चित करून त्यामार्फत लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. प्रस्ताव सादर केल्यानंतर ९० दिवसांच्या आत लाभार्थ्याला लाभ देणे आवश्यक आहे. असे असतानाही गेल्या तीन वर्षांत अनेक प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.सन २०१७-१८ मध्ये ४६ शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यांपैकी ३८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. २ प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित असून ६ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. २०१८-१९ या वर्षात ६२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले.

त्यापैकी १७ मंजूर, १० तालुकास्तरावर प्रलंबित, ३३ विमा कंपनीकडे प्रलंबित तर २ नामंजूर करण्यात आले आहेत. २०१९-२० या वर्षात ४६ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी अद्याप एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. तर ११ तालुकास्तरावर व ३५ विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत.सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत १५४ मृत व अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी केवळ ५५ शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे. तर ८ प्रस्ताव विमा कंपन्यांनी नाकारले आहेत. तसेच तालुकास्तरावर २१ व विमा कंपनीकडे ७० असे एकूण ९१ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

९१ प्रस्तावातील ४६ प्रस्तावांना अजून मुदत आहे. तर २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षांचे ३५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. अनेकदा विमा कंपनीकडे प्रलंबित प्रस्तावांबाबत विचारणा करूनही विमा कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे अधीक्षक कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.परिपूर्ण प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित राहिल्यास त्यावर व्याज द्यावेगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे अधीक्षक कृषी विभागाकडे प्राप्त झालेले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे सादर केले जातात. उचित कालावधीत प्रस्ताव सादर करूनही काही वेळा कंपनीकडे प्रस्ताव प्रलंबित राहत असून लाभार्थी वारसांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे.त्यामुळे विमा कंपनीकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करून ते प्रलंबित राहिल्यास त्यावर व्याज देण्यात यावे, याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विमा कंपनीला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.प्रस्ताव करण्याबाबत कृषी पर्यवेक्षकांची जबाबदारी१० सप्टेंबर २००९ च्या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारणे ही कृषी पर्यवेक्षकांची जबाबदारी आहे. मात्र, हे पर्यवेक्षक परिपूर्ण प्रस्ताव सादर करीत नाहीत. त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी व अपघाग्रस्तांचे वारस या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेAccidentअपघातsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी