शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील ऐनारी पोलिस पाटलाच्या कुटुंबाची चौघांना मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 18:28 IST

ठार मारण्याची दिली धमकी

वैभववाडी : ऐनारी गावच्या पोलिस पाटलाच्या कुटुंबीयांनी गावातील विशाल जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिलांना काठी, पट्ट्याने मारहाण केली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. गाडीला बाजू देण्याच्या रागातून शुक्रवारी वादावादी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी किरण विचारे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.ऐनारी गडगेवाडी येथे राहत असलेले विशाल जाधव हे मॅकेनिक असून त्यांचे एडगाव येथे गॅरेज आहे. त्यांची आई आनंदी विचारे ही ऐनारीत एकटीच राहते. शुक्रवारी  विशाल पत्नी आणि मुलीसह आईला भेटण्यासाठी ऐनारीला जात होता. ऐनारी गावात जाणाऱ्या रस्त्याला गाडी गेल्यानंतर त्यांच्या गाडीच्या पाठीमागून किरण विचारे यांचा ट्रक चालला होता. बाजू देण्यासाठी विचारे यांनी जोरजोरात हॉर्न वाजवला; परंतु पत्नी आणि मुलीला गाडीतून उतरवतो आणि गाडी बाजूला घेतो, असे त्यांनी विचारेंना सांगितले; परंतु गाडी लगेच बाजूला न घेतल्याचा विचारेंना राग आला होता. हा प्रकार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला होता.त्यानंतर शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते पत्नी व मुलीला घेऊन कारने पुन्हा ऐनारीला गेले. गाडीतून उतरताना किरण विचारे व त्यांच्या कुटुंबातील चार महिला हातात काठ्या घेऊन उभ्या होत्या. जाधव कुटुंब गाडीतून उतरताच विचारे कुटुंबातील पाच जणांनी पट्टा, काठ्या घेऊन विशाल, त्याची पत्नी व लहान मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

ठार मारण्याची धमकीसोडविण्यासाठी आई तेथे गेली असता तिलाही त्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करीत किरण विचारे यांनी ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार विशाल जाधव याने पोलिसांत दिली आहे. जाधव कुटुंबीयांना मारहाण करणारा किरण विचारे हा ऐनारी पोलिस पाटील यांचा मुलगा असून मारहाण करणारे अन्य सर्व जण त्यांच्याच कुटुंबातील आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस